Latest

Jaipur bomb threat: दिल्लीनंतर जयपूरमधील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थानची राजधानी जयपूरमधील (Jaipur bomb threat) किमान चार शाळांना सोमवारी (दि.१३) ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली असून, पोलिसांची टीम ईमेल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे येथील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमधील धमकी मिळालेल्या शाळांमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. बॉम्ब आणि श्वान पथकासह पोलिसांचे (Jaipur bomb threat) पथक शाळांमध्ये पोहोचले असून, तपास सुरू असल्याची माहिती जयपूरचे पोलिस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी दिली आहे.

काल रविवारी (दि.१३) दुपारी राजधानी दिल्लीतील बुरारी सरकारी रुग्णालय आणि मंगोलपुरीच्या संजय गांधी रुग्णालयासह दोन सरकारी रुग्णालयांमध्ये तत्सम ईमेल प्राप्त झाले. दिल्ली-एनसीआरमधील अनेक शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी हे बॉम्ब धमकीचे ईमेल (Jaipur bomb threat) आले आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे.

यापूर्वी दिल्लीतील डाबरीतील दादा देव रुग्णालय, हरी नगरमधील दीनदयाल उपाध्याय (डीडीयू) रुग्णालय, दिलशाद गार्डनमधील गुरु तेग बहादूर (जीटीबी) रुग्णालय, हिंदूराव रुग्णालय, मलका गंज आणि अरुणा असफ अली राजपूर रोडचे शासकीय रुग्णालय 'या' सरकारी रुग्णालयांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या आल्या होत्या. दरम्यान काल रविवारी (दि.१३) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील अज्ञात ईमेल खात्यातून बॉम्बची धमकी मिळाली. पाठवणाऱ्याने आवारात स्फोटक यंत्र असल्याचीही धमकी आल्याचे देखील माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT