Latest

रावणगाव : ट्रकमधून हायड्रोजेनेटेड वनस्पती तेलाची चोरी करणारे जेरबंद

अमृता चौगुले

रावणगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी (ता. दौंड) येथील महामार्गालगत असलेल्या हाँटेल डि पॅलेस समोर असणा-या मोकळ्या जागेत उभ्या टॅंकरमधून ११० लिटर तब्बल ६२ लाख ४३ हजार ९२० रुपये किंमतीचे हायड्रोजेनेटेड वनस्पती तेलाची प्लस्टिक ड्रममधून चाललेली चोरी दौंड पोलिसांनी पकडली. या प्रकरणी चार जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.

विजय कैलासनाथ यादव (वय ३२), राजेश अरूण बाविसकर (वय २४, दोघे रा. कृष्णान सोमजाईवाडी खोपोली, ता. खालापुर, जि. रायगड), सोपान दादाराव कथीळकर (वय ३०, रा. कटफळ, धामणगाव, ता. मोर्शी, जि. अमरावती), सुनिल भानुदास देवकाते (रा. न्हावी, ता. इंदापुर जि. पुणे, सध्या रा. खडकी, ता. दौंड अशी) या चोरांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी येथील हाॅटेल डी.पॅलेस समोर टॅकर (एमएच ४६ बीयु ७८७८) यामधून ११० लिटर हायड्रोजेनेटेड वनस्पती तेलाची प्लस्टिक ड्रममधून चोरी करीत असताना पकडले. त्यांच्याकडील ६२ लाख ४३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेतले आहे. दौंडचे पोलीस हवालदार गोरख मलगुंडे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT