Latest

Glassopteris : चंद्रपूर जिल्ह्यात आढळली २० कोटी वर्षांपूर्वीची वनस्पती पानांची जिवाष्मे

अविनाश सुतार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीजवळ जुरासिक ते पर्मियन या 28 ते 19.5 कोटी वर्षादरम्यानच्या काळातील ग्लासोप्टेरिस (Glassopteris) या प्रजातींच्या वनस्पती पानांची सुंदर जिवाष्मे येथील पर्यावरण आणि जीवाष्म संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांना आढळून आली आहेत. यापूर्वी त्यांनी डायनोसॉर, हत्ती, स्ट्रोमॅटोलाईट, शंख शिंपले, वृक्ष आणि पानांचे जिवाष्मे चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शोधून काढली असून ते त्यांच्या स्वत:चे संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत.

भद्रावती ते चंदनखेडा मार्गावर शेती आणि जंगलात काही ठिकाणी ही अतिप्राचीन पुरावे सापडली आहेत. भद्रावती आणि वरोरा परिसरात त्यांनी डायनोसॉरची जिवाष्मे शोधून काढली होती. आता या त्याहीपेक्षा जुन्या २० कोटी वर्षे जुन्या जुरासिक काळातील जिवाष्मे (Glassopteris) आढळल्यामुळे नवीन इतिहासाला उजाळा मिळाला आहे. या परिसरात जिवाष्मे असल्याची भूशास्त्र विभागाची नोंद होती. परंतु चांगली जिवाष्मे मिळाली नव्हती. गेल्या काही वर्षापासून प्रा. सुरेश चोपणे या परिसरात संशोधन कार्य करीत होते.

चंद्रपूर जिल्हा हा भूशास्त्रीय दृष्ट्या एक संग्रहालय असून येथे ३०० ते ६ कोटी वर्षे जुने बहुतेक प्रकारची खडक तर २५ कोटी ते २५ हजार वर्षे प्राचीन जिवाष्मे आढळतात. २० कोटी वर्षादरम्यान जेव्हा हे वृक्ष जिवंत होती. आणि विशाल डायनोसॉर जिवंत होते. तेव्हा पृथ्वीवर पांजिया नावाचा एकच खंड होता आणि भारत हा भूप्रदेश आजच्या आस्ट्रेलियाला लागून होता. प्राचीन भारताच्या आणि चीनच्यामध्ये टेथीस नावाचा समुद्र होता. पुढे कोट्यवधी वर्षाने भारताचा भूखंड उत्तरेला सरकत गेला आणि चीनच्या भूखंडाला टक्कर दिली. यातून हिमालय निर्माण झाला. अजूनही भूकवचाची ही गती उत्तरेकडे सरकत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील भूगर्भात अजून असे अनेक रहस्य दडलेली असून भूशास्त्र विभागाने आणि संशोधकानी विस्तृत संशोधन केल्यास भविष्यात दृष्टीपथास पडतील, अशी माहिती प्रा. चोपणे यांनी दिली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT