Latest

MagicMirror : भविष्य सांगणारा आरसा! चेहरा दाखवताच देताे आरोग्याची माहिती; करताे सावध

Arun Patil

कॅलिफोर्निया : सध्या सोशल मीडियावर अतिशय वेगळ्या प्रकारचा आरसा व्हायरल हात असून, या आरशाचे MagicMirror अनोखे वैशिष्ट्य म्हणजे तो चक्क भविष्य सांगण्याची क्षमता राखून आहे! आता आरशामध्ये भविष्य दिसते, असे काही चित्रपटात काल्पनिकपणे दर्शवले गेले आहे. मात्र, प्रत्यक्षात असा आरसा नसतो, याची त्यावेळी जवळपास सर्वांना कल्पना असायची.

आता मात्र या नव्या, अनोख्या वैशिष्ट्यपूर्ण आरशामुळे MagicMirror सर्वच समीकरणे बदलली, तर आश्चर्याचे कारण असणार नाही. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2024 मध्ये हा आरसा लाँच करण्यात आला. टेक्नॉलॉजी ब्रँड न्युरा लॉजिक्सने अनुरा मॅजिक मिरर नावाचा हा अनोखा आरसा लाँच करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित हा आरसा आहे. या आरशात तुम्ही तुमचा चेहरा दाखवला की तुम्हाला भविष्यातील आरोग्याबाबतची माहिती मिळते. हा आरसा फक्त तुमचा चेहरा पाहून तुमच्या आरोग्याचा अंदाज लावू शकतो. त्याचप्रमाणे जीवाला धोका असेल, तर यासाठीही सावध करू शकतो. त्यामुळे हा आरसा खरोखरच एआयचा आणखी एक अनोखा चमत्कार आहे, असे अधोरेखित झाले, तर त्यात आश्चर्याचे कारण राहणार नाही.

अनुरा मॅजिक मिरर MagicMirror हा 21.5-इंचाचा टॅब्लेट-मिरर हायब्रिड आहे. जो चेहर्‍यावरील रक्त प्रवाहाचे विश्लेषण करून आरोग्याविषयी माहिती देण्यासाठी एआयचा वापर करतो. हा आरसा चेहर्‍याच्या आधारे वेगवेगळ्या आजारांच्या धोक्याचा अंदाज लावू शकतो. हा आरसा फक्त चेहरा स्कॅन करून 100 पेक्षा जास्त आरोग्य मापदंडांचा मागोवा घेतो. यात उच्च रक्तदाब, ताप, नैराश्य किंवा मानसिक आरोग्य, स्ट्रोक, पल्स रेट, श्वसनसंबंधी आजार, डायबेटिस यांचा समावेश आहे.

'डेली मेल'ला दिलेल्या निवेदनात, न्युरा लॉजिक्सचे प्रवक्ते म्हणाले, 'अनुरा मॅजिक मिरर MagicMirror निश्चितपणे भविष्यातील संभाव्य आरोग्य धोके शोधत असताना, तुम्हाला खबरदारीची पूर्वसूचना देतो. मात्र, त्याच्या अचूकतेबाबत आताच भाष्य करणे घाईचे ठरू शकते.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT