Latest

माजी क्रिकेटर रोहित शर्माचे निधन, जयपूरमध्ये घेतला अखेरचा श्वास

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. राजस्थान रणजी संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू रोहित शर्माचे (वय 40) निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्याच्यावर जयपूरमध्ये उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाच्या वृत्ताने राजस्थान क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे.

राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे सचिव भवानी शंकर समोटा यांनी सांगितले की, 'रोहित शर्मा अष्टपैलू खेळाडू होता. तो त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जात होता. तसेच लेग स्पिन गोलंदाजीही करायचा, जी अनेकवेळा संघासाठी उपयुक्त ठरली होती. रोहित शर्माने रणजी ट्रॉफी, प्रथम श्रेणी आणि इतर फॉरमॅटमध्ये राजस्थानचे प्रतिनिधित्व केले. त्याने 2004 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटचा प्रवास सुरू केला, जो 2009 मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर तो 'अ' श्रेणीचे सामने खेळत राहिला. त्याने राजस्थानकडून 7रणजी सामने, 28 एकदिवसीय रणजी सामने आणि चार टी-20 सामनेही खेळले. ते राजस्थानच्या जयपूरमध्ये आरएस नावाने स्वतःची क्रिकेट अकादमी चालवत होते.'

SCROLL FOR NEXT