Latest

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती व अमरावतीचे पाहिले महापौर असलेले माजी आमदार देवीसिंह शेखावत (८९) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. दोनच दिवसापूर्वी त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची शुक्रवारी (दि.२४) सकाळी प्राणज्योत मालवली.

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या कुटुंबासमवेत पुण्यात स्थायिक झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी शेखावत यांना तीव्र हृदयविकाराचा धक्का आल्याने केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. शुक्रवारीच सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

देवीसिंह शेखावत हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रीय झाल्यानंतर विदर्भातील अमरावती शहराचे पहिले महापौर होण्याचा मान मिळवत विदर्भात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. यानंतर १९८५ मध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने त्यांना विधानसभची उमेदवारी देत आमदारपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली होती. राजकारणा बरोबर शिक्षण क्षेत्राची आवड असलेले शेखावत यांनी १९७२ मध्ये मुंबई विद्यापीठातून पीएचडी देखील मिळवली होती. ते विद्या भारती शिक्षण संस्था फाउंडेशन संचलित संस्थेचे प्राचार्य म्हणून काम देखील पाहिलेले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT