Latest

माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन

अमृता चौगुले

नारायणगाव: पुढारी वृत्तसेवा :  जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ दत्तात्रेय बेनके यांचे रविवारी(दि.११) रात्री साडेदहा वाजता निधन झाले. जुन्नर चे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होत. अतुल यांच्या सह त्यांच्या मागे ३ मुले, पत्नी,दोन भाऊ व पाच बहिणी असा परिवार आहे. वल्लभ बेनके हे जुन्नरचे चार वेळा आमदार होते. 1985 ते 1995 आणि अशी सलग दहा त्यानंतर 2004 ते 2014 या काळात ते पुन्हा आमदार होते. 2006 ते 2011 ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष होते. कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून दहा वर्षे त्यांनी काम पाहिले. चिलेवाडी धरण,व पिंपळगाव जोगा कालव्याचे कामे या काळात झाले. शिवनेरी विकास परिसर आराखडा आमदार वल्लभ बेनके यांच्या काळात सुरू झाला. ते विघ्नहर कारखान्याचे काही वर्ष संचालक होते.

सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव नारायणगाव येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. हिवरे बुद्रुक या त्यांच्या जन्मगावी येथील त निवासस्थानी दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता त्यांच्या जन्म गावी हिवरे या ठिकाणी अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. माजी आमदार वल्लभ बेनके यांचा दोस्ताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित होता. पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली.
जिल्हा परिषद शाळांसाठी बेंच व संगणक उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते त्यांनी ही जिल्ह्यात योजना राबविली ते खो खो जिल्हा संघटनेचे अध्यक्ष होते. किल्ले शिवनेरी परिसर विकास समितीची स्थापनेत त्यांचे योगदान होते तो पायलट प्रोजेक्ट राज्याने इतर किल्यांसाठी स्विकारला,यशवंतराव चव्हाण पर्यटन येडगाव धरण परिसर प्रकल्प संकल्पना व पर्यटनाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवलीओझर देवस्थान परिसर कायापालट व सांस्कृतिक हाॅलच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे.

SCROLL FOR NEXT