Latest

Foreign exchang : विदेशी चलन साठा आठ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर

सोनाली जाधव

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : देशाच्या विदेशी चलन साठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात वाढ झाली असून 24 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात हा साठा 5.98 अब्ज डाॅलर्सने वाढून 578.77 अब्ज डाॅलर्सवर गेला आहे. तत्पूर्वीच्या आठवड्यात हा साठा 12.8 अब्ज डाॅलर्सने वाढून 572.8 अब्ज डाॅलर्सवर गेला होता. (Foreign exchang)

याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये विदेशी चलन साठा 645 अब्ज डाॅलर्सच्या विक्रमी स्तरापर्यंत वाढला होता. मात्र त्यानंतर त्यात वेगाने घट झाली होती. 24 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात एकूण साठ्यातील विदेशी चलनाचे प्रमाण 4.38 अब्ज डाॅलर्सने वाढून 509.72 अब्ज डाॅलर्सवर गेले आहे. दुसरीकडे सोन्याचा साठा 1.37 अब्ज डाॅलर्सने वाढून 45.48 अब्ज डाॅलर्सवर गेला आहे. तर स्पेशल ड्राईंग राईट्स अर्थात एसडीआर ठेवींचे प्रमाण 201 दशलक्ष डाॅलर्सने वाढून 18.41 अब्ज डाॅलर्सवर गेले आहे. एकूण विदेशी चलन साठ्याच्या तुलनेत काही निधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जमा करावा लागतो. त्यानुसार 27 दशलक्ष डाॅलर्सचा निधी आयएमएफकडे जमा करण्यात आला आहे. आयएमएफकडे जमा झालेला निधी आता 5.15 अब्ज डाॅलर्सवर गेला असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT