Latest

Maharashtra Rain Alert | राज्यातील ‘या’ भागांत अतिवृष्टीचा अंदाज; मराठवाड्यातही बहुतांश भागांत मुसळधार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या सर्वच भागांत (काही अपवाद वगळता) गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषत:, घाटमाथा, कोकण या भागांत पावसाचा कहर सुरूच आहे. अतिमुसळधार पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे; शिवाय नद्यांना पूर आले आहेत. आता पावसाची 'रेंज' आणखी वाढणार असून, विदर्भात मान्सून जोरदार सक्रिय झाला आहे; तर कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिवृष्टी या प्रमाणात पाऊस पडणार आहे.

राज्यात जोरदार पाऊस पडण्यास मान्सूनचा ट्रफ कारणीभूत असून, शनिवारी (दि. 22) हा मान्सूनचा ट्रफ जैसलमेर, रतलाम, बीटुल, चंद्रपूर, कोंडगनगाव ते दक्षिण भागाकडून अंदमानच्या समुद्रापर्यंत सक्रिय आहे. याशिवाय दक्षिण विदर्भ ते छत्तीसगड या भागापर्यंत चक्रीय स्थिती कार्यरत आहे. यामुळे विदर्भात मान्सून सक्रिय झाला आहे. याशिवाय दक्षिण पूर्व मध्य प्रदेश, दक्षिण पश्चिम राजस्थान आणि ईशान्य गुजरातपर्यंत चक्रीय स्थिती कार्यरत आहे. याबरोबरच 24 जुलै रोजी उत्तर आंध्र प्रदेश, उत्तर ओडिशा ते मध्य पूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे.

अलर्ट
पालघर – ऑरेंज, ठाणे – यलो, मुंबई – यलो, रायगड – ऑरेंज, रत्नागिरी – ऑरेंज, सिंधुदुर्ग – ऑरेंज, पुणे (घाटमाथा) – यलो, कोल्हापूर (घाटमाथा) – ऑरेंज, सातारा (घाटमाथा) – ऑरेज, हिंगोली – यलो, नांदेड – यलो, लातूर – यलो, अकोला – यलो, अमरावती – यलो, भंडारा – यलो, बुलडाणा – यलो, गडचिरोली – यलो, वर्धा – यलो, वाशिम – यलो, यवतमाळ-यलो.

गेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस (मि.मी.मध्ये)
कोकण : सांताक्रुझ – 204, पालघर – 135, उल्हासनगर – 130, सावंतवाडी – 124, महाड – 164, ठाणे – 114, माथेरान, कल्याण – 111, वसई – 110.
मध्य महाराष्ट्र : गगनबावडा-174, महाबळेश्वर – 152, लोणावळा – 112, राधानगरी – 79, कोल्हापूर – 38, सोलापूर – 17, पुणे-14.
मराठवाडा : किनवट – 138, हिमायतनगर – 92, हदगाव – 90, नांदेड – 47, हिंगोली – 22, तुळजापूर – 19.
विदर्भ : यवतमाळ – 316, मूर्तीजापूर – 190, उमरखेड – 104, तेल्हारा -146, देवळी – 91.
घाटमाथा : अबोले – 170, कोयना (पोफळी) – 142, दावडी- 117, धारावी – 117, ताम्हिणी – 112, लोणावळा (ऑफिस) – 111, लोणावळा (टाटा) – 108, लोणावळा (खोपोली) – 103, कोयना (नवजा) – 99, डुंगुरवाडी – 91, भिरा – 77, वळवण – 72, खंद – 66, शिरगाव -65, शिरोटा – 62, भिवपुरी – 53, ठाकूरवाडी – 190, वानगाव – 180.

  • पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र (काही भाग) घाटमाथ्यावर जोरदार पाऊस
  • विदर्भातही मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधारचा अंदाज
  • मराठवाड्यात विजांच्या कडकडाट, मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी मुसळधार.
SCROLL FOR NEXT