Latest

Britain Census : इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच ख्रिश्चन धर्मीयांची संख्या 50 टक्क्यांपेक्षा कमी; नास्तिकांच्या संख्येत वाढ

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Britain Census : इंग्लंडच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या लोकसंख्येत ख्रिश्चन धर्मीयांची संख्या निम्म्या पेक्षाही कमी नोंदवली गेली आहे. मागील जनगणनेपेक्षा यावेळी 13 टक्क्यांनी ही संख्या कमी आहे. तर नास्तिक म्हणवणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासोबतच मुस्लिम आणि त्यापाठोपाठ हिंदू धर्मीयांची संख्या देखील वाढल्याची नोंद झाली आहे.

(Britain Census)  इंग्लंडमध्ये नुकताच जनगणना अहवाल जाहीर झाला आहे. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या 2021 ची जनगणना प्रसिद्ध केली आहे. त्यात समोर आलेल्या आकडेवारीनुसार, इंग्लंड आणि वेल्समध्ये ख्रिश्चन धर्मीयांची संख्या 50 टक्क्यांपेक्षा देखील खाली आली आहे. अहवालानुसार 2011 च्या जनगणनेत 59.3 टक्के नागरिकांची नोंद  ख्रिश्चन म्‍हणून झाली होती. यंदाच्या जनगणनेत 46.2 टक्के लोकांनी (2.75 कोटी लोकांनी) स्वतःला ख्रिश्चन सांगितले आहे. म्हणजेच इंग्‍लंडमध्‍ये जवळपास ख्रिश्चन लोकसंख्येत 13.1 टक्क्यांनी घड झाली आहे.

तर 2011 च्या मुस्लिम जनसंख्येच्या प्रमाणात 2021 च्या जनगणनेत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. 2011 मध्ये मुस्लिम लोकसंख्या 27 लाख म्हणजेच 4.9 टक्‍के होती यामध्‍ये वाढ झाली असून आता ती 39 लाख झाली आहे. म्हणजेच 6.5 टक्के नोंदवली गेली आहे. तर हिंदूंची संख्या देखील वाढली आहे. 2011 मध्ये इंग्लंडमध्ये हिंदुंची लोकसंख्या 8.18 लाख 1.5 टक्के होती ती आता 10 लाख 1.7 टक्के झाली आहे.

Britain Census : नास्तिकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ

इंग्लंडच्या 2021 च्या जनगणनेत विशेष नोंद घ्यावी, असा बदल जाणवला आहे. इंग्लंडमध्ये कोणताही धर्म मानत नाही. किंवा नास्तिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नास्तिकांची संख्या 37.2 टक्के इतकी वाढली आहे. एकूण जनगणनेच्या एक चतुर्थांशपेक्षा अधिक आहे.

लंडनमध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. त्याच्या अहवालानुसार, शीख समुदायाची संख्याही वाढली आहे. 2011 मध्ये सुमारे 4 लाख 23 हजार शीख बांधव होते. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 0.8 टक्के, आता ही टक्‍केवारी  0.9 टक्के (सुमारे 5 लाख 24 हजार) इतकी झाली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्येही बौद्धांची लोकसंख्या वाढली आहे. 2011 मध्ये ते 0.4 टक्के (249,000) होते, जे गेल्या वर्षी 0.5 टक्के (273,000) पर्यंत वाढले. ज्यू समुदायाच्या लोकसंख्येमध्ये कोणताही बदल झाला नाही. तो अजूनही 0.5 टक्के कायम आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT