Latest

मदुराईहून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे हवेतच इंजिन पडले बंद

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मदुराईहून आलेले इंडिगोचे विमान आज (दि.२९) मुंबई विमानतळावर विमानाचे एक इंजिन बंद असतानाही सुरक्षितपणे उतरले. इंडिगो A321 (VT-IUJ) विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. प्रॅट अँड व्हिटनी (PW) इंजिन बंद पडले, तरीही वैमानिकाने सुरक्षित लॅडिंग केले.

मदुराईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट ६E२०१२ मध्ये मुंबईत उतरण्यापूर्वी तांत्रिक बिघाड झाला. दुहेरी इंजिन असलेले विमान एका इंजिनवर सुरक्षितपणे चालू शकते. पायलटने हे विमान मुंबईत सुरक्षित उतरवले असून दुरूस्तीनंतर ते पुन्हा कार्यरत होईल. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करतो, असे एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT