नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यात सर्वाधिक मोठी समजली जाणारी नारायणगाव ग्रामपंचायतिचा निवडणुकीचा निकाल हाती आला असून मुक्ताई ग्रामविकास पॅनलचे १७ उमेदवार विजयी झाले आहेत, तर मुक्ताई ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा अवघा एक उमेदवार विजयी झालेला आहे. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाने बाजी मारली आहे. सत्ताधारी गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार शुभदा वावळ २ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.