Latest

पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वामध्‍ये बॉम्बस्फोट, पाच पोलिस ठार, अनेक जखमी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथे आज (दि.८) सोमवारी झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात पाच पोलिस ठार झाले. या हल्‍ल्‍यात 20 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. बाजौर जिल्ह्यात पोलिओविरोधी मोहिमेसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिस पथकाला ट्रकमधून नेले जात असताना हा हल्ला झाला.

पोलीस पथकाला लक्ष्य करण्यात आलेला बाजौरमधील मामुंद परिसर असून हा भाग अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानच्या सीमेवर हल्ले वाढले आहेत. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही, मात्र याआधीही पाकिस्तानी तालिबानने पोलिओ लसीकरण मोहिमेवर अनेक हल्ले केले आहेत.

रविवारीही पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चारजण ठार झाले होते. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दोन वाहनांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. पाराचिनारहून पेशावरला जाताना हा हल्ला झाला. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT