Latest

गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्थीला पुण्यात दारू बंदी; जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आदेश

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गणेशोउत्सव 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जाणार आहे. या काळात पाच दिवस पूर्णपणे मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. गणेशोउत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. यामध्ये मद्यविक्री करणारे दुकाने, परमिट रुम, बिअरबारचा समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अनंतचतुर्थी (31 ऑगस्ट) आणि गणेश विसर्जनाच्या दिवसी (9 सप्टेंबर) संपूर्ण जिल्ह्यात मद्यविक्री बंद असणार आहे. 5 आणि 7 व्या दिवशी ज्या भागात गणेश विसर्जन केले जाते. अशा भागातील मद्यविक्री बंद ठेवली जाणार आहेत. तर गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्यविक्रीचे दुकाने विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT