Latest

गुजरातमधील मच्छिमारांच्या बोटीला रायगडच्या समुद्रात जलसमाधी! खलाशी सुखरुप

backup backup

अलिबाग; जयंत धुळप : गुजरातमधील मच्छीमारांची बोट रायगडजवळील सागरी किनाऱ्यापासून ९ मैल अंतरावर बोट बुडाल्याची घटना घडली. या बुडणाऱ्या बोटीसाेबत असलेल्या गुजरातमधीलच दोन बोटींनी या बुडणाऱ्या बोटीला बाहेर काढण्याचा कसाेशीने प्रयत्न केले मात्र बाेट बुडाली. दरम्यान या बुडालेल्या बाेटीवरील सात खलाशांना सुखरुप वाचविण्यात यश आले आहेत. याबाबतची माहिती रायगडचे अप्पर जिल्हा पाेलीस अधिक्षक अतूल झेंडे यांनी दिली आहे.

भरडखोल येथील काही मच्छीमार समुद्रात मच्छीमारीसाठी जात होते. त्यांना रायगडजवळील दिवेआगर-आडगाव यादरम्यान एक बोट बुडाल्याचे आढळून आले. या बोटीत एकूण सात खलाशी होते. बोटीची फळी तुटल्याने बोटीमध्ये पाणी शिरल्याने ही घटना घडली होती. पाणी बोटीत शिरल्यानंतर बोटीतीली खलाशांनी आवाज देण्यासाठी सुरु केला होता. यानंतर भरडखोल येथील मच्छीमारांचे लक्ष या बोटीकडे गेले. या मच्छमारांनी या खलाशांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या मच्छिमारांच्या बोटीला खलाशांना वाचविण्यात यश आले. गुजरातमधील ही बाेट बुडत असल्याबाबत माहिती प्राप्त हाेताच कोस्टगार्डची बोट तत्काळ मदतीसाठी घटनास्थळी पाेहाेचली. पाणी भरलेली बोट त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाणी पूर्ण भरल्याने बुडालेली बोट बाहेर निघाली नाही. बोटीचे टोक पाण्यावर तरंगत होते. अंधार पडल्यानंतर बोट काढण्याचे काम थांबवण्यात आले.

पोलीस अधिकारी झेंडे यांनी याबाबत माहिती देत असताना सांगितले की, १७ ऑगस्ट रोजी बुडालेली बाेट सुमुद्र प्रवाहात वाहत दिवेआगर बाजूला आलेली आहे. त्यातील सर्व खलाशी सुखरूप वाचले आहेत. कोणीही जखमी नाही. आज (दि. २०) आढळून आलेली बुडालेली बोट समुद्रात आतमध्ये असल्याने व हवामान बरोबर नसल्याने लगेच काढता येत नाही, त्यासाठी पुढील प्रयत्न करण्यात येत असल्याचे झेंडे यांनी अखेरीस सांगीतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT