Latest

दिल्‍लीत कोचिंग सेंटरला भीषण आग, चार विद्यार्थी जखमी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्लीतील मुखर्जी नगर भागातील कोचिंग सेंटरला आज ( दि. १५) आग लागली. अग्‍निशमन दलाची ११ वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. कोचिंग सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. आग लागल्यानंतर कोचिंग सेंटरमध्ये उपस्थित विद्यार्थी दोरीच्‍या मदतीने खाली येतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल हाेत आहे. या दुर्घटनेत  कोचिंग सेंटरमधील चार विद्यार्थी जखमी झाले आहेत.

मुखर्जी नगरमध्ये बत्रा सिनेमाजवळ गयाना भवन आहे, जिथे आग लागली. अग्निशमन दलाच्या एकूण 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत बचाव कार्य सुरू आहे. कोचिंग सेंटरमध्ये धुराचे लोट पसरल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे. आग लागल्यानंतर कोचिंग सेंटरमध्ये उपस्थित विद्यार्थी दोरीवरून उडी मारून जीव वाचवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे.

धुरामुळे इमारतीमधून बाहेर पडण्‍यासाठी एकच गर्दी

दुपारी १२ वाजण्‍याच्‍या सुमारास ही दुर्घटना घडली. प्राथमिक अंदाजानुसार, इलेक्ट्रिक मीटरमध्ये आग लागली. आगीचे स्‍वरुप गंभीर नव्‍हतं मात्र प्रचंड धूर झाला. त्‍यामुळे विद्यार्थी घाबरले. इमारतीच्या मागील बाजूने खाली येतात एकच गर्दी उसळली यामुळे चार विद्यार्थी जखमी झाले.

या दुर्घटनेबद्‍दल माहिती देताना दिल्‍ली पोलिसांचे प्रवक्‍ते सुमन नलवा यांनी सांगितले की, "आग इमारतीच्या मीटरमध्ये लागली. वरच्या मजल्यावर धुराचे लोट पसरल्याने गोंधळ उडाला. नागरी सेवांसाठी कोचिंग सेंटर होते, काही विद्यार्थी खिडकीतून खाली येण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये ३-४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. आग आटोक्यात आणण्यात आली आहे."

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT