Latest

Maharashtra budget 2024-25 : ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ : राज्‍याच्‍या अंतरिम अर्थसंकल्‍पात तरतूद

नंदू लटके

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. ( Maharashtra budget 2024-25 )

राज्‍यात ८ लाख ५० हजार नवीन सौरकृषी पंप हाेणार वितरीत

अंतरिम अर्थसंकल्‍पातील कृषी विषयक महत्त्‍वपूर्ण तरतुदींची घोषणा करताना अर्थमंत्री अजित पवारांनी म्‍हणाले की, शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप" ही नवीन योजना राबवली जाणार असल्‍याचे सांगितले.  राज्‍यात ८ लाख ५० हजार नवीन सौरकृषी पंप वितरीत केले जातील. राज्यात सर्व उपसा सिंचन योजनांचे येणाऱ्या दोन वर्षात सौर उर्जीकरणाचा मानस आहे, असेही ते म्‍हणाले. शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा करण्‍यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेअंतर्गत 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे.  सुमारे 37 हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच पुरवठा करणे तसेचडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत १ लाख शेतकऱ्यांना सौर उर्जा कुंपणासाठी अनुदान देण्‍यात येईल, असेही ते म्‍हणाले. ( Maharashtra budget 2024-25 )

 जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 700 गावांमधील 1 लाख 59 हजार 886 कामांना मंजूरी दिली जाईल. मृद व जलसंधारण विभागास ४ हजार २४७ कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. "नमो शेतकरी महासन्मान निधी योजना" अंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1 हजार 691 कोटी 47 लाख रुपये वितरण करण्‍यात आले आहे, अशीही माहिती त्‍यांनी दिली. ( Maharashtra budget 2024-25 )

सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता कृषी विभागास 3 हजार 650 कोटी रुपये, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागास 555 कोटी रुपये फलोत्पादन विभागास 708 कोटी रुपयांची तरतूद करण्‍यात आली आहे.बळीराजा जलसंजीवनी योजनेत 46 प्रकल्प पूर्ण झाले असून मार्च 2025 पर्यंत आणखी 16 प्रकल्प पूर्ण होणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT