Latest

पंजाबमधील कारागृहात टोळीयुद्धाचा भडका : मुसेवाला हत्‍या प्रकरणातील दोन गँगस्‍टरचा ‘गेम’

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाबमधील गोइंदवाला साहिब कारागृहातच आज ( दि. २६) टोळीयुद्धाचा भडका उडला. दोन गटात झालेल्‍या तुफान हाणामारीत पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवाला यांच्‍या हत्‍या प्रकरणातील आरोपी गँगस्‍टर मनदीप आणि मनमोहन ठार झाले.  गुंड केशव हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने पंजाबमध्‍ये खळबळ उडली असून, कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तरनतारन येथील गोइंदवाल साहिब कारागृह आहे. रविवारी कारागृहातील दोन गटात तुफान हाणामारी झाली. यामध्‍ये गँगस्टर मनदीप तुफान हा जागीच ठार झाला. गँगस्टर मनमोहन सिंग मोहन आणि भटिंडा येथील रहिवासी गुंड केशव हे गंभीर जखमी झाले होते. दोघांना अमृतसर येथील रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. यावेळी उपचार सुरु असताना मनमोहन याचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती पोलीस अधीक्षक जसपाल सिंग धिल्‍लन यांनी दिली.

मनदीप तुफान हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्‍या प्रकरणातील आरोपी होता. मनदीप याला पोलिसांनी गँगस्टर मनी रियासह अटक केली. तरनतारनच्या वैरोवाल ठाणे अंतर्गत खाख गावातून पकडण्यात आले होते. गँगस्टर मनदीप तुफान जग्गू हा भगवानपुरिया टोळीचा शार्प शूटर होता. जग्गू भगवानपुरियाची चौकशी केल्यानंतर त्याचे नाव मूसवाला खून प्रकरणात समोर आले होते. तसेच मनमोहन हाही मुसेवाला हत्‍या प्रकरणातील आरोपी होता.

SCROLL FOR NEXT