Latest

FIFA World Cup 2022 : मेस्सी-नेमार विरुद्ध रोनाल्डो?

Arun Patil

दोहा, वृत्तसंस्था : फुटबॉल हा खेळ जगभरात खेळला जातो. त्याचे चाहतेही दुनियाभर विखुरले आहेत. ब्राझील, अर्जेंटिना, पोर्तुगाल, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांना जगातील वेगवेगळ्या भागातून चाहतावर्ग आहे; परंतु खेळाडूंची क्रेज पाहता अर्जेंटिनाचा लियोनल मेस्सी, ब्राझीलचा नेमार आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचे फॅन्स जगाच्या पाठीवर कोठेही सापडतील. यातील मेस्सी आणि रोनाल्डो यांच्या फॅनमधील रायव्हली जगाला नवीन नाही. हे तिन्ही संघ सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) उपांत्यपूर्व फेरीत पुढे आले आहेत. त्यामुळे तिघांच्या चाहत्यांमध्येही उत्साह आहे. नेमार किंवा मेस्सी आणि रोनाल्डो, अंतिम सामन्यात एकमेकांसमोर असतील, असे चित्र रंगवत आहेत. तसे झाले तर जगाला हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळेल यात शंका नाही.

अर्जेंटिना आणि पोर्तुगाल संघ जसजसे प्रगती करत आहेत, तसतसे चाहते मेस्सी-रोनाल्डोच्या संभाव्य संघर्षाची अपेक्षा करत आहेत. नेमारच्या चाहत्यांनाही वाटते की ब्राझील अंतिम फेरीत असेल पण ते अंतिम फेरीत पोहोचण्याच्या वाटेत त्यांना अर्र्जेेंटिनाचा पराभव करावा लागेल. तसे झाले तर अंतिम फेरीत ब्राझीलसमोर पोर्तुगाल हा संघ असेल, असे त्यांना वाटते. अशा परिस्थितीत नेमार आणि रोनाल्डो हे जगातील दोन महान खेळाडू फुटबॉलच्या सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमने-सामने येऊ शकतात. ब्राझीलला हरवून अर्जेंटिना पुढे आले तर मेस्सी आणि रोनाल्डो अशी लढत होवू शकते.

प्राथमिक फेरीत पोर्तुगालने घानाविरुद्ध 3-2 असा विजय मिळवून स्पर्धेत शानदार सुरुवात केली. त्यानंतर उरुग्वेचा 2-0 असा पराभव केला. दक्षिण कोरियाविरुद्ध 1-2 ने पराभूत होऊनही सहा गुणांसह अंतिम 16 साठी पात्र ठरले. तर लियोनल मेस्सीच्या संघाने सलामीच्या लढतीत सौदी अरेबियाविरुद्ध 1-2 असा धक्कादायक पराभव पत्करला. त्याने मेक्सिको आणि पोलंडविरुद्ध शानदार विजय मिळवले. मेक्सिकोचा 2-0 आणि पोलंडचा ही 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाने सहा गुणांसह गटात अव्वल स्थान पटकावले आणि उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

अर्जेंटिनाने राऊंड ऑफ 16 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1 असा विजय मिळवला. या सामन्यात त्याच्याकडून लियोनल मेस्सीने शानदार गोल केला. त्याचवेळी पोर्तुगालने स्वित्झर्लंडविरुद्ध 6-1 असा मोठा विजय मिळवला. या सामन्यात रोनाल्डोला गोल करता आला नाही. पोर्तुगालसाठी त्याला बाद फेरीत अद्याप एकही गोल करता आलेला नाही. पोर्तुगालचा सामना आफ्रिकन संघ मोरोक्कोशी होणार आहे. मोरोक्कोने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा 3-0 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. त्याचवेळी अर्जेंटिनाचा संघ नेदरलँडविरुद्ध खेळणार आहे. नेदरलँडने अमेरिकेचा 3-1 असा पराभव केला. पोर्तुगालने उपांत्य फेरी गाठली तर त्याचा सामना इंग्लंड किंवा गतविजेत्या फ्रान्सशी होईल. त्याचवेळी अर्जेंटिनाचा संघ उपांत्य फेरीत क्रोएशिया किंवा ब्राझीलविरुद्ध खेळू शकतो.

मेस्सी-रोनाल्डोचा अंतिम सामना शक्य? (FIFA World Cup)

जर अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत ब्राझील किंवा क्रोएशिया यापैकी एकावर विजय मिळवला तर तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्याचबरोबर फ्रान्स किंवा इंग्लंडला पराभूत केल्यास पोर्तुगालही विजेतेपदाच्या लढतीत पोहोचेल. अशा स्थितीत लियोनल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात लढत होऊ शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT