Latest

Fifa Football World Cup 2022 : आफ्रिकेतील निर्वासित कॅम्प ते कॅनडा फुटबॉल टीम; असा आहे ‘या’ खेळाडूचा संघर्षमय प्रवास

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : अल्फोन्सो डेव्हिस (Alphonso Davies)जेव्हा 23 नोव्हेंबर रोजी अल रायन स्टेडियमवर जेव्हा बेल्जियमचा सामना करण्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा त्याच्या कष्टांनी भरलेल्या संघर्षाच्या कथेचा हा एक नवा अध्याय सुरु होईल. जो हा संघर्षमय प्रवास त्याने आफ्रिकेतील निर्वासित शिबिरापासून ते जागतिक फुटबॉलच्या सर्वात मोठ्या महाकुंभ मेळा समजल्या जाणाऱ्या FIFA विश्वचषक 2022 पर्यंत केला आहे. डेव्हिसने कॅनडा फुटबॉल संघ आणि बायर्न मुनिक संघासाठी रिकॉर्ड ब्रेक कामगिरी केली असली तरी अवघ्या वयाच्या २२ वर्षी तो जगाला आपल्या जीवनसंघर्षाची वेगळ्या पद्धतीने ओळख करुन देऊ इच्छित आहे. (Fifa Football World Cup 2022)

घाना ते फूटबॉल (Fifa Football World Cup 2022)

त्याच्या वयाचे अनेक खेळाडू सध्या खेळाच्या उच्चतम स्थानी पोहचण्याची अभिलाषा बाळगत स्वत:ला सिद्ध करु इच्छित आहेत. तेव्हा त्याने एक अनुभवी खेळाडू म्हणून स्वत:ला डेव्हिसने सिद्ध केले आहे. चार बुंडेसलिका (Bundesliga) किताब, एक चॅम्पीयन लीग विजेते पदक आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत डेव्हिसने पटकावले आहे.

या सर्वांहून वेगळे म्हणजे या चिवट माणसाने आपल्या जीवनाची सुरुवात कोठून केली हे अधीक महत्त्वाचे आहे. डेव्हिस याचा जन्म २२ वर्षांपुर्वी घाना देशातील निर्वासितांच्या शिबीरात झाला होता. जेथे त्याने आपल्या जीवनातील पहिली चार वर्षे आई – वडिलांसह लिब्रियातील गृहयुद्धात पळून घाना येथील निर्वासितांच्या कॅम्पमध्ये आधार घेतला होता.

या निर्वासितांच्या कॅम्पचे वर्णन करताना डेव्हिसची आई व्हिक्टोरिया म्हणते,'जेव्हा आम्ही जेवण घेण्यासाठी जात होतो तेव्हा आम्हाला मृतदेहांमधून वाट काढत होतो'. या भयानक परिस्थितून स्वत:चा बचाव करत डेव्हिसच्या आई – वडिलांनी अखेर कॅनडा हा देश गाठला. ज्या देशात आईस हॉकीचा बोलबाला असताना डेव्हिसने मात्र फुटबॉलची वाट धरली. अगदी प्राथमिक शाळेतूनच त्याने आपला फुटबॉलमधील जलवा दाखविण्यास सुरुवात केली होती. (Fifa Football World Cup 2022)

सर्वात कमी वयाचा कॅनडियन फूटबॉलपटू

यानंतर डेव्हिस याने ॲडमाऊंटन येथे एका फुटबॉल अकादमीमध्ये प्रवेश घेतला. वयाच्या 14 व्या वर्षी, त्याने व्हँकुव्हरमधील चाचण्यांदरम्यान सर्वांना प्रभावित केले. तो वयाच्या 15 वर्षे आणि आठ महिन्यांत MLS (मेजर लीग स्कोअरर) मध्ये खेळणारा सर्वात तरुण कॅनेडियन बनला. कॅनाडाचे नागरिकत्त्व मिळाल्यानंतर तो अवघ्या १६ वर्षे ७ महिन्यांच्या वयात सर्वात कमी वयाचा कॅनडियन आतंरराष्ट्रीय फुटबॉलपटू ठरला. (World Cup 2022)

मेस्सीचा चाहता

जुलै २०१७ मध्ये डेव्हीस CONCACAF गोल्ड कपमध्ये त्याने तीन गोल करत सर्वात अधिक गोल करणारा फूटबॉलपटू ठरला. या स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात जमैकाकडून कॅनडाला पराभव स्विकारावा लागला होता. डेव्हिसचे माजी प्रशिक्षक क्रेग डेलरिम्पल त्याची तुलना फ्रांसचा युवास्टार कियान एम्बाप्पे (Kylian Mbappe) याच्याशी तुलना करतात. कारण, डेव्हिसची गती आणि शक्ती ही एम्बाप्पेप्रमाणे आहे. पण, लियोनेल मेस्सी (Lionel Messi) याला डेव्हिस आपला आदर्श मानतो.

महागडा फूटबॉलपटू

डेव्हिस याला २०१८ साली बायर्न म्युनिक संघाने (Bayern Munich) तब्बल २२ मिलियन डॉलर देऊन संघात दाखल करुन घेतले. ज्याद्वारे डेव्हिस हा मेजर लीग स्कोरअर खेळणारा सर्वात महागडा खेळाडू ठरला. एकंदरीत त्याचा हा सर्व प्रवास अचंबित करणारा आहे. पण, तो जादुई नसून त्याने सर्व संघर्षात स्वत:ला सिद्ध करत आजच्या स्थिती तो स्वत:ला अभिमानाने पहात आहे.

वर्ल्डकपचा दबाव

36 वर्षांनंतर प्रथमच फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या कॅनडाच्या संघाचा डेव्हिस हा अविभाज्य भाग आहे. सध्या डेव्हिस कतारमधील कॅनडाच्या संघासाठी अव्वल खेळाडूंपैकी एक असल्याचा आनंद घेत आहे. विश्वचषकात खेळताना तो चिंतीत व काळजीत असल्याचे मान्य करत असले तरी. तो म्हणतो, " थोडंस काळजीत असणे माझ्यासाठी रास्त आणि सामान्य आहे, कारण मी आणि माझा संघ ज्या संघर्षातून या ठिकाणी पोहचलोय तेच आमच्यासाठी खूप आहे. पण, आम्हाला प्रत्येकाला स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे आणि जिथे जाऊन आम्ही खेळणार आहे तिथे हे दाखवावे लागेल की आम्ही काय करु शकतो'.

खरतर या फुटबॉलच्या महाकुंभ मेळ्यात बलाढ्य संघ एकमेकांशी भिडणार आहेत. अनेकजण यंदाच्या वर्ल्डकपचे दावेदार आहेत. ३६ वर्षांनंतर या महासंग्रामात पात्र ठरणाऱ्या कॅनडाला या स्पर्धेचे अंतिम पदक पटाकावेल असे कोणी म्हणणार नाही. पण, कॅनडा हा डार्क हॉर्स संघ डेव्हिस सारख्या खेळाडूंपाहून नक्कीच ठरु शकतो. अवघ्या २२ वर्षी या युवा खेळाडूने आत्ताच जागतिक स्तरावर स्वत:च्या नावाची क्रेझ निर्माण केली आहे. अत्यंत संघर्षमय प्रवास बघणाऱ्या आणि पूर्ण करणाऱ्या डेव्हिससाठी हा संघर्ष त्याच्या जीवनाप्रमाणे जीवघेणा नसला तरी आव्हानात्मक नक्कीच असणार आहे.


अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT