Latest

FIFA WC Netherlands vs Ecuador : नेदरलँड विरुद्ध इक्वेडोर सामना सुटला बरोबरीत

Arun Patil

दाेहा, पुढारी वृत्तसेवा : फिफा विश्वचषकातील (FIFA WC Netherlands vs Ecuador) 'अ' गटातील सामन्यात नेदरलँड आणि इक्वेडोर यांची 1-1 अशी बरोबरी झाली.

सामन्यात अवघ्या सहाव्या मिनिटाला कोडी गॅपको याने नेदरलँडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम होती. उत्तरार्धात 49 व्या मिनिटाला एनेर व्हेलेन्सिया याने गोल करून इक्वेडोरला बरोबरीत आणले. सामन्यात शेवटपर्यंत ही बरोबरी कायम राहिली. त्यामुळे एक विजय, एक बरोबरी आणि प्रत्येकी 4 गुणांमुळे 'अ' गटात हे दोन संघ पुढे आहेत. (FIFA WC Netherlands vs Ecuador)

सुरवातीपासून या सामन्यावर इक्वेडोरने नियंत्रण राखले होते. परंतु गोल करण्यात इक्वेडोरच्या खेळाडुंना यश आले नाही. पहिल्या अर्ध्या तासातच नेदरलँडने इक्वेडोरवर 1-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या सहाव्या मिनिटालाच नेदरलँडच्या कोडी गॅक्पो याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. डेवी क्लासेन याने दिलेल्या पासवर कोडी गॅक्पो याने अजिबात चूक केली नाही. गॅक्पोचा हा स्पर्धेतील दुसरा गोल होता. (FIFA WC Netherlands vs Ecuador)

SCROLL FOR NEXT