Latest

FASTag : फास्टॅग बंद होणार; जीपीएस आधारित टोल संकलन लवकरच

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशभरात नवीन जीपीएस उपग्रह-आधारित टोल संकलन सुरू केले जाणार असून यामुळे फास्टॅग बंद होईल, टोल नाके काढले जातील आणि साहजिकच रांगेत उभे राहण्याचीही आवश्यकता भासणार नाही, असे संकेत आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. (FASTag)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही टोल प्रणाली सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू होणे अपेक्षित आहे. वाहतूक कोंडी कमी करणे आणि वाहनचालकांकडून महामार्गांवर प्रवास केलेल्या अचूक अंतरासाठी शुल्क आकारणे हा या निर्णयाचा उद्देश आहे. स्वयंचलित टोल संकलन सक्षम करण्यासाठी वाहने न थांबवता स्वयंचलित नंबर प्लेट ओळखणार्‍या प्रणालीचे दोन पायलट प्रकल्प देखील चालवले आहेत, असेही यापूर्वी सांगण्यात आले आहे. (FASTag)

SCROLL FOR NEXT