Latest

खोरच्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

अमृता चौगुले

खोर :पुढारी वृत्तसेवा :  खोर (ता.दौंड) पिंपळाचीवाडी येथील मोहन गंगाराम चौधरी या ५२ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना सर्प दंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोहन चौधरी हे मंगळवारु( दि. २२) सकाळच्या प्रहारी आपल्या शेतात जनावरांना गवत आणण्यासाठी गेले असताना त्यावेळी उसाच्या शेतात गवत कापत असताना त्यांचा घोणस जातीच्या अतिविषारी सर्पावर पाय पडल्याने त्यांना सर्पदंश झाला.

त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल व पुढे इतर दवाखान्यात नेहण्यात आले. मात्र तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

SCROLL FOR NEXT