Latest

Lanka Shaktipeeth :५१ शक्तिपीठांपैकी एक श्रीलंकेतील प्रसिद्ध लंका शक्तिपीठ

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेतील प्रसिद्ध असे लंका शक्तिपीठ. हे शक्तिपीठ जाफनापासून फक्त ३५ किलोमीटर आहे. (Lanka Shaktipeeth) नल्लूर येथे हे मंदिर असून त्यास "इन्द्राक्षी शक्तिपीठ" नावाने ओळखले जाते. लंका शक्तिपीठ त्रिकोणेश्वर मंदिराच्या जवळ आहेय देवराज इंद्रने येथे काली मातेची पूजा केली होती. रावण आणि भगवान राम यांनी येथे देवी शक्तीची पूजा केली होती. (Lanka Shaktipeeth)

पुराणानुसार जिथे देवी सतीच्या शरीराच्या अवयव वा दागिने पडले. तिथे शक्तिपीठ बनले. हे शक्तिपीठ पवित्र तीर्थ म्हटले गेले. जे संपूर्ण भारतीय उपमहाद्वीपमध्ये पसरले गेले आहेत. देवीपुराणात ५१ शक्तिपीठांचे वर्णन करण्यात आले आहेत. श्रीलंकेतील लंका शक्तिपीठमध्ये माता सतीचे "पैंजण" (नूपुर) पडले होते. येथे माता सतीला 'इन्द्राक्षी' आणि भगवान शिवला 'राक्षसेश्वर' म्हटलं गेलं.

लंका शक्तिपीठाची कथा

५१ शक्तिपीठांमध्ये लंका शक्तिपीठाचा समोवश आहे. प्राचीन कथे नुसार, भगवान शिव यांचे सासरे राजा दक्ष यांनी यज्ञाचे आयोजन केलं होतं. यामध्ये त्यांनी शिव भगवान आणि माता सती यांनी निमंत्रण पाठवले नाही. कारण, राजा दक्ष भगवान शिव यांना आपल्या बरोबरीचे मानत नव्हते.

ही गोष्ट माता सती यांना आवडली नाही. त्या निमंत्रणाशिवाय, यज्ञात सहभागी झाले. यज्ञ स्‍थळी भगवान शिव यांचा अपमान झाला, जे माता सती यांना सहन झाले नाही आणि त्यांनी हवन कुंडात उडी घेतली.

भगवान शिव यांना ही गोष्ट जेव्हा समजली. तेव्हा ते तिथे पोहोचले आणि माता सती यांच्या शरीराला हवन कुंडातून काढून तांडव करू लागले. त्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात गोंधळ निर्माण झाला होता. संपूर्ण ब्रह्मांडला या संकटातून वाचवण्यासाठी भगवान विष्णूने माता सती यांच्या शरीराला आपल्या सुदर्शन चक्राने ५१ भागांमध्ये विभागणी केली, जे अवयव जिथे जिथे पडले, ते शक्तिपीठ बनले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT