Latest

Surinder Shinda: प्रसिद्ध पंजाबी गायक सुरिंदर शिंदा यांचे निधन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध पंजाबी गायक सुरिंदर शिंदा (surinder shinda) यांचे लुधियानामधील एका खासगी रुग्णालयात छोटं ऑपरेशन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या शरीरात इन्फेक्शन पसरलं होतं. शिंदा यांच्या मृत्यूने पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली. डीएमसी रुग्णालयात अनेक दिग्गज लोक पोहोचले. (surinder shinda)

काही दिवसांपूर्वी उपचारासाठी त्यांना दीपक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अनेक दिवसांच्या उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना डीएमसी रुग्णालयात नेण्यात आले. आज बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुरिंदर शिंदा यांच्या मृत्यूनंतर पंजाबी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूच्या सूचनेनंतर अनेक लोक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT