Latest

Kannada producer Soundarya Jagadish : कन्नड चित्रपट निर्माता सौंदर्य जगदीश राहत्या घरी आढळले मृतावस्थेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ चित्रपट इंडस्ट्रीत मोठी शोककळा पसरली आहे. दिग्गज चित्रपट निर्माते सौंदर्य जगदीश यांनी आर्थिक तंगीमुळे आपले जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा मृतदेह बंगळुरु येथील राहत्या घरी आढळला. (Kannada producer Soundarya Jagadish) पण, सौंदर्य यांनी आपले जीवन संपवले की आणखी काही कारण आहे, याबाबतची पुष्टी झालेली नाही. (Kannada producer Soundarya Jagadish)

पोलिस आणि त्यांच्या जवळच्या सूत्रांनी रविवारी पीटीआयला सांगितले की, जगदीश यांनी रविवारी सकाळी बंगळुरुच्या महालक्ष्मी लेआऊट येथील आपल्या निवासस्थानी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना तत्काळ राजीव नगरच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पीटीआय रिपोर्ट्सनुसार, जगदीश यांचे मित्र श्रेयस यांनी पत्रकारांना सांगितले की, 'जगदीश यांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आम्ही त्यांना रुग्णालयात नेले. तिथे त्यांना मृत घोषित केले. कारण काय होतं, हे जाणून घेण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरु आहे. त्यांना कोणतीही आरोग्याची समस्या नव्हती. आम्ही तुम्हाला आता कारण सांगण्यास असमर्थ आहोत.'

SCROLL FOR NEXT