Latest

Armaan Malik Engagement : २ वर्षानी मोठ्या आशनासोबत अरमाननं उरकला साखरपुडा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरमान मलिकने त्याची लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत नुकतेच साखरपुडा ( Armaan Malik Engagement ) उरकला आहे. या कार्यक्रमात अरमान आशनाला एंगेजमेंट रिंग परिधान केल्यानंतर कपलने लिपलॉक केलं आहे. या साखरपुड्याचे काही फोटो अरमानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केलं आहेत.

संबंधित बातम्या 

अरमानने २८ ऑगस्ट रोजी आशनाला प्रपोज केलं होते. यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत २२ ऑक्टोबर २०२३ रोजी दोघांचा साखरपुडा ( Armaan Malik Engagement ) पार पडला. या सोहळ्यात अरमान व्हाईट कलरच्या शूट हॅडसम दिसला. तर आशनाने प्रिटेंट डिझाईन असलेली व्हाईट रंगाची साडी परिधान केली होती. यावेळी दोन्ही कपल खूपच क्यूट दिसत होते. कपल आनंदीत असून हातात-हात घालून फोटोला पोझ दिली आहे. दरम्यान दोघेजण रोमँन्टिक होत एकमेंकाना लिपलॉक केलं आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'officially future Mr & Mrs ?'. असे लिहिले आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान आशना अरमानपेक्षा दोन वर्षानी मोठी असल्याची माहिती समोर आली आहे. आशना यूट्यूबर आणि फॅशन डिझायनर आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अरमानने 'मैं हूं हीरो तेरा', 'बोल दो ना जरा', 'बेसब्रिया', 'तुम जो मिले', 'तेरे दिल में', 'कौन तुझे' आणि 'पहला प्यार ' यासारखी अनेक गाणी गायिली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT