Latest

अमित शहा फेक व्हिडिओ प्रकरणी, काँग्रेस आमदार मेवाणींच्‍या पीएसह आपच्‍या कार्यकर्त्याला अटक

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्‍या प्रकरणी गुजरात पोलिसांनी काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांचे स्‍वीय सहाय्‍यक ( पीए) सतीश वनसोला आणि आपच्या कार्यकर्त्यासह दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणी 'एएनआय'ला माहिती देताना पोलीस आयुक्‍त लविना सिन्‍हा यांनी सागिलते की, "केंद्रीय गृहमंत्री अमित शjh यांचा बनावट व्हिडिओ 2 फेसबुक प्रोफाइलवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या प्रकरणी आम्ही कलम 505A, 1B, 469, 153A आणि IT कायदा अंतर्गत गुन्‍डहा दाखल केला आहे. एक फेसबुक प्रोफाईल सतीश वनसोला याच्या नावावर असून, या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे."

काय आहे प्रकरण?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाचा फेक व्हिडिओ (Fake Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते कथितपणे "भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले तर आम्ही असंवैधानिक एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण हटवू" असे म्हणत आहेत. या बनावट व्हिडिओबाबत भाजप आणि गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध एफआयआर नोंदवला होता. शहा यांच्या एडिट केलेल्या व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांना २ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये एक तक्रार भाजपने केली होती, तर दुसरी तक्रार गृह मंत्रालयाने केली होती. तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल सायबर विंग IFSO युनिटने एफआयआर नोंदवला होता.

SCROLL FOR NEXT