Latest

Fake Currency : बनावट नोटांचा सुळसुळाट

Arun Patil

2021-22 या आर्थिक वर्षात बनावट नोटांची (Fake Currency) संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिली आहे. यामध्ये 500 रुपयाच्या बनावट नोटा एका वर्षात दुप्पट झाल्या आहेत. अन्य नोटांच्या तुलनेत 500 आणि 2000 रुपयांच्या बनावट नोटा बाजारात येण्याचे प्रमाण अधिक आहे. खोट्या नोटांची ही वाढती संख्या काळजी वाढविणारी आहे.

बनावट नोटांची एकूण संख्या 2,30,971

चलनात 21.3 टक्के बनावट नोटा

गेल्या वर्षाच्या तुलनेत बँकेने 500 च्या 101.9 टक्के अधिक नोटा आणि 2 हजारच्या 54.16 टक्के अधिक नोटा शोधून काढल्या. मार्च 2022 पर्यंत बँकेत जमा 500 आणि 2 हजारच्या नोटांत 87.1 टक्के बनावट नोटा होत्या. मार्च 2021 पर्यंत हा आकडा 85.7 टक्के होता. ही संख्या 31 मार्च 2022 पर्यंत चलनात असलेल्या नोटांच्या एकूण 21.3 होती.

बनावट नोटांचे वाढते प्रमाण (Fake Currency)

अन्य नोटांचा विचार केल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 रुपयाच्या बनावट नोटा 16.4 टक्के आणि 20 रुपयाच्या नोटा 16.5 टक्के वाढल्या आहेत. त्याशिवाय 200 रुपयाच्या बनावट नोटांमध्ये 11.7 टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. चांगली गोष्ट म्हणजे, गेल्या वर्षीचे आकडे पाहता या आर्थिक वर्षात 50 रुपयाच्या बनावट नोटा 28.7 टक्के आणि 100 रुपयाच्या बनावट नोटा 16.7 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

10 व 500 रुपयांच्या नोटांची चलती

भारतीय ग्राहकांच्या व्यवहारात 10 आणि 500 रुपयांच्या नोटांची मोठी चलती आहे. यामध्ये 500 रुपयांच्या नोटेचे प्रमाण सर्वाधिक 34.9 टक्के आणि 10 रुपयाच्या नोटेचे प्रमाण 21.3 टक्के आहे.

अशी ओळखा खरी नोट

बनावट नोटांच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने यापूर्वीच पाचशेची खरी नोट कशी ओळखावी यासंदर्भात सूचना जारी केली आहे. त्यानुसार, 500 रुपयाच्या नोटेला सरळ पाहिल्यानंतर देवनागरी भाषेत 500 हा आकडा दिसतो. याशिवाय मध्यभागी महात्मा गांधी यांचे चित्र दिसते. त्यामध्ये लहान अक्षरात 'भारत' आणि 'इंडिया' असे लिहिलेले दिसते. याचठिकाणी एक सिक्युरिटी थ्रेड दिसतो आणि तो नोट सरळ धरल्यावर हिरव्या
रंगात दिसतो.

SCROLL FOR NEXT