Latest

Extremly Heavy Rain: उत्तर कोकणासह ‘या’ जिल्हयांना पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : येत्या २४ तासात उत्तर कोकण आणि आसपासच्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता (Extremly Heavy Rain) आहे; असे भारतीय हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या बुलेटीनमध्ये सांगितले आहे, अशी माहिती IMD पुणे विभागप्रमुख के. एस. होशाळीकर यांनी त्यांच्या वैयक्तिक ट्विटरवरून दिली आहे.

डॉ. होशाळीकर यांनी ट्विटरवरून हवामानासंदर्भात दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, पुढील २४ तासात उत्तर कोकण आणि उत्तरेकडील भागात अतिवृष्टी (Extremly Heavy Rain) होण्याची दाट शक्यता आहे. रायगड, पालघर याठिकाणी देखील अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंदुधुर्ग याठिकाणी देखील अतिमुसळधार पाऊस (Extremly Heavy Rain) पडणार आहे. घाटभागात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा आहे. तसेच मराठवाडा विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे, अशी माहिती डॉ. होशाळीकर यांनी दिली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT