Latest

Expensive Weddings In India : अंबानी परिवाराचेचं नव्हे तर भारतातील ‘ही’ आहेत ८ सर्वात महाग लग्ने

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय लग्ने आपल्या असाधारण समारंभ, मोठ्या प्रमाणात मेजवानी आणि महागड्या भेटवस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. ही लग्ने एक भव्य उत्सव म्हणून साजरे केले जात आहेत. भारतात लग्नात होणाऱ्या खर्चावर लाखों-करोडोपर्यंत खर्च होतात. (Expensive Weddings In India ) अनेक लोक आपल्या खास दिवस स्मरणीय बनवण्यासाठी अनेक वर्षांपर्यंत बचत करतात. पण, जेव्हा सर्वात श्रीमंत व्यक्तींची गोष्ट येते, तेव्हा शाही लग्ने ठरतात. (Expensive Weddings In India )

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती नेहमी असे लग्नसोहळे करतात. त्यांच्या लग्नसोहळ्यात कोट्यावधी खर्च होतात. या भव्य लग्न समारंभात कोट्यावधी रुपये खर्च होतात. या लग्न सोहळ्यांमध्ये, भारतीय विवाहसोहळे त्यांच्या विलक्षण समारंभांसाठी, विस्तृत मेजवानीसाठी आणि महागड्या भेटवस्तूंसाठी प्रसिद्ध आहेत, जे एक भव्य उत्सव तयार करतात.

भारतातील विवाहसोहळ्यांवर होणारा सरासरी खर्च लाखो ते कोटी रुपयांपर्यंत होतो. अनेक व्यक्ती त्यांचा खास दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी वर्षानुवर्षे बचत करतात. जेव्हा सर्वात श्रीमंत व्यक्तींचा विचार केला जातो, तेव्हा त्यांचा विवाह हे एक रॉयल लग्न ठरते. भव्य कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आणि डोळे विस्फारणारे खर्च असणारे विवाहसोहळे आयोजित केले जातात. आपण नुकताच पाहिले की, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात कोट्यवधी रुपये खर्च झाले. पण तुम्हाला माहितीये का, याआधी भारतातील ८ असे लग्नसोहळे झाले, ज्यामध्ये कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

रिपोर्ट्सनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा प्री-वेडिंग सोहळा १,२०० कोटी रुपयांहून अधिक बजेटवर करण्यात आले. प्री-वेडिंगमध्ये इतका खर्च तर जुलैमध्ये अंबानी रिवार आपल्या मुलाच्या लग्नात किती खर्च करतील, याचा विचारचं न केलेला बरा. आतापर्यंत महागडे लग्नसोहळ्यांवर एक नजर टाकूया.

१. लक्ष्मी मित्तल यांची मुलगी वनिशा मित्तल आणि ब्रिटिश बिजनेसमन अमित भाटिया यांचे लग्न

लक्ष्मी मित्तल यांची मुलगी वनिशा मित्तल आणि ब्रिटिश बिझनेसमन अमित भाटिया यांच्या लग्नसोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २००४ मध्ये झालेल्या या लग्नाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सर्वाधिक महागडे लग्न नोंद झाले. फोर्ब्सनुसार, या लग्नात २४० कोटी रुपये खर्च झाले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, ऐश्वर्या राय, काइली मिनोग, शाहरुख खान आणि अन्य दिग्गजांनी लग्नात उपस्थिती लावली होती.

२. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि उद्योगपती आनंद पिरामल यांचे लग्न

बिलेनियर मॅग्नेट मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि बिझनेसमन आनंद पिरामल यांचा विवाह सोहळा २०१८ मध्ये झाला. रिपोर्टनुसार, बियॉन्सेला ४५ मिनिटे परफॉर्म करण्यासाठी ३३ कोटी रुपये घेतले होते.

३. गली जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणी रेड्डी आणि हैदराबादचे व्यवसायिक विक्रम देव रेड्डी यांचा मुलगा राजीव रेड्डी

खण उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी टीकेला सामोरे जावे लागले. रेड्डींनी तथाकथितलग्नावर ५०० कोटी रुपये खर्च केले होते. हे असामान्य लग्न सोहळा बंगळूर पॅलेसमध्ये पाच दिवस सुरु होता. अनेक बॉलीवूड दिग्गज आणि राजकीय नेत्यासहित २० हजार पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. त्यांच्या मुलीने (वधू) नेसलेल्या लाल कांजीवरम साडीची किंमत १७ कोटी रुपये होती.

४. सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांचा मुलगा सुशांतो रॉय आणि सीमांतो रॉय यांचे डबल लग्न

सुब्रतो रॉय यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी कोणतीही कमी भासू दिली नाही. २००४ मध्ये रॉय यांनी लखनऊच्या सहारा स्टेडियममध्ये सुशांतो आणि सीमांतो यांचा लग्नसोहळा आयोजित केला होता. आठवडाभर सुरु राहणाऱ्या उत्सवात ११ हजारहून अधिक पाहुण्यांनी भाग घेतला. यामध्ये बॉलीवूड आणि क्रिटा जगतातील उल्लेखनीय दिग्गज सहभागी होते.

५. स्टॅलियन ग्रुपचे संस्थापक सुनील वासवानी यांची मुलगी सोनम वासवानी आणि नवीन फॅबियानी यांचे लग्न

स्टॅलियन ग्रुपचे संस्थापक आणि संयुक्त अरब अमीरात (यूएई) चे एक प्रमुख व्यवसायिक सुनील वासवानी यांनी आपली मुलगी सोनम वासवानी यांचे कमल फॅबियाना यांचा मुलगा नवीन यांच्याशी केले. ऑस्ट्रियातील व्हिएन्नामधील हे एक ग्रँड लग्न होते. बेलवेडेर पॅलेसमध्ये भव्य लग्नाचे आयोजन केले. व्हिएन्नाच्या पॅलेस लिकटेंस्टीन पार्कमध्ये मेहंदी सोहळा झाला होता. या सोहळ्यासाठी २१० कोटी रुपये खर्च झाले होते.

६. डेन्यूबचे संस्थापक एडेल साजन आणि सना खान

डेन्यूब होमचे प्रमुख एडेल साजनने कॉनकॉर्डिया-क्लास कोस्टा फासिनोसा क्रूज जहाजावर एक अनोखे लग्न केले. बार्सिलोना, स्पेनहून मार्सिले आणि कान्स, फ्रान्सहून सवोना, इटलीमध्ये क्रुझवर लग्न पार पडले. या सोहळ्यात पाहुण्यासाठी व्यक्तिगत हॅरोड्स हॅम्पर्स, बादशाह आणि विशाल-शेखर यांचे संगीत परफॉर्म, गौहर खान आणि सुष्मिता सेन यांचे भाषण आणि रिसेप्शनमें १० लेअर केक कापण्यात आला होता. या लग्नासाठी १०० कोटीहून अधिक खर्च करण्यात आले होते.

७. स्टील टायकून प्रमोद मित्तल यांची मुलगी सृष्टी मित्तल आणि इन्वेस्टमेंट बँकर गुलराज बहल यांचे लग्न

सृष्टी मित्तल आणि गुलराज बहल यांचे लग्न २०१३ मध्ये बार्सिलोना येथे झाले. तीन दिवसीय डेस्टिनेशन वेडिंग, समृद्धी आणि भव्यतेचे उत्तम उदाहरण होते. लग्नात ५०० लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यामध्ये ५०५ कोटींहून अधिक रुपये खर्च झाले होते.

८. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे लग्न

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. दोन दिवसीय आयोजित सोहळ्यात जवळचे पाहुणे आणि मित्र-परिवार सहभागी झाला होता. मुख्य लग्नसोहळा मुंबईमध्ये तीन दिवस सुरु होता. रिपोर्टनुसार, लग्नपत्रिकेची किंमत १.५ लाख रुपये होती. स्विट्जरलँडमध्ये एका आठवड्यात ५०० पाहुण्यांसाठी बुक केलेल्या भव्य हॉटेलचे रुमचे एका दिवसाचे भाडे जवळपास १ लाख रुपये होते.

SCROLL FOR NEXT