नवी दिल्ली : वृत्तसंस्था : ईशान्येकडील तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे मतदान आटोपले आहे. त्रिपुरात १६ फेब्रुवारी, तर मेघालय-नागालँडमध्ये सोमवारी मतदान झाले. सायंकाळी आलेल्या एक्झिट पोलमध्ये त्रिपुरासह नागालँडमध्ये भाजप आघाडीला बहुमत मिळेल, तर मेघालयात त्रिशंकू स्थिती राहील, असे अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आले आहेत.
त्रिपुरात भाजप आपली सत्ता कायम राखेल, असा कौल तीन वेगवेगळ्या एक्झिट पोलनी एकमताने दिला आहे. येथे इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा हा भाजपचा एकमेव मित्रपक्ष आहे.