Latest

युरोपियन वैज्ञानिक घडवणार कृत्रिम ‘सूर्यग्रहण’!

Arun Patil

पॅरिस : युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) ची 'प्रोबा-3' मोहीम सप्टेंबरमध्ये भारताच्या पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने लाँच केली जाणार आहे. या अनोख्या मोहिमेत दोन छोटे सॅटेलाईट, एक 340 किलोग्रॅमचा कोरोनाग्राफ आणि एक 200 किलोग्रॅमचा ऑकुल्टर समाविष्ट आहे, जे सुमारे 150 मीटरच्या अंतरावर उड्डाण करतील.

स्पेस एजन्सीने म्हटले आहे की, ही मोहीम एक कृत्रिम सूर्यग्रहण घडण्यासाठी दोन उपग्रहांच्या मधून उड्डाण घडवेल, ज्यामुळे सूर्याच्या धूसर कोरोनाची नवी द़ृश्ये समोर येतील. कृत्रिम सूर्यग्रहणाशिवाय या मोहिमेचा उद्देश सौर कोरोना आणि सौर वार्‍यांच्या गतिशीलतेचा अभ्यास करणे हा आहे. अर्थात, त्याचा पृथ्वीवर कोणताही परिणाम दिसणार नाही.

'प्रोबा-3' मिशनमध्ये दोन सुधारित छोटे सॅटेलाईट असतील. त्यांना अंतराळातील एका वेगळ्या स्थितीसाठीच स्पष्टपणे डिझाईन करण्यात आले आहे. एक सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी कोरोनाग्राफच्या रूपात कार्य करतो, तर दुसरा एक ऑकुल्टरच्या रूपात कार्य करतो, जो सूर्याच्या प्रखर प्रकाशाला रोखतो.

ऑकुल्टरचे सूर्याच्या प्रकाशाला रोखणे कोरोनाग्राफला एकाच वेळी अनेक तासांसाठी धूसर सौर कोरोनाची प्रतिमा देण्याची संधी देईल. याचा अर्थ एक प्रकारे ही स्थिती कृत्रिम सूर्यग्रहणासारखी असेल. या मोहिमेचा प्राथमिक उद्देश सूर्याचे निरीक्षण करणे हा आहे. दोन सॅटेलाईटस्चे अलायमेंट 150 मीटर अंतरावर काही मिलिमीटरच्या सीमेत असेल. 'प्रोबा-3' मोहिमेचे यश भविष्यातील स्पेस टेलिस्कोप आणि इंधन भरण्याच्या मोहिमांसाठीही महत्त्वाचे ठरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT