Latest

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे झुरीकमध्ये मराठी बांधवाकडून उत्साही स्वागत

Shambhuraj Pachindre

दावोस; पुढारी वृत्तसंस्था : जागतिक आर्थिक परिषद- वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची २०२४ ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरु झाली आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले आहेत. या पार्श्वभुमीवर स्वित्झर्लंडमधील भारतीयांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले. स्वित्झर्लंडमध्ये विविध भागात राहणाऱ्या भारतींयांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. (Eknath Shinde)

भारतीयांच्या विशेषतः या मराठी भाषिकांनी झुरीक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास येण्याचे मान्य केल्याबद्दल या सर्व मराठी बांधवांनी विशेष आनंदही व्यक्त केला. या निमित्ताने स्वित्झर्लंडमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या मराठीजनांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याबाबत स्वागताच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. तसेच परिषदेच्या यशासाठीही शुभेच्छा दिल्या. (Eknath Shinde)

बृहन्महाराष्ट्र स्वित्झर्लंडचे (जीनिव्हा) अध्यक्ष अमोल सावरकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महत्वाच्या गुंतवणूक परिषदेसाठी इथे येत आहेत. इतक्या व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी मराठी जनसमुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे. हे विशेष. म्हणूनच आम्हाला आनंद झाला आहे. त्यांच्या सर्व उपक्रमांना आम्ही शुभेच्छा देत आहोत. महेश बिराजदार (मुळचे लातूर), मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे नेतृत्व आम्हा मराठी जनांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करताना, त्यांना शुभेच्छा देताना खूप खूप आनंद होत आहे.

श्रीमती किर्ती मालिनी गद्रे (पदाधिकारी महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड), मी मुळची ठाण्याची आहे. त्यामुळे आमच्या ठाण्यातील शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येथे येत आहे. याचा सर्वात मोठा आनंद आहे. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे मोठी तयारी केली आहे. त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली आहे, याचाही खूप मोठा आनंद आहे.

शेखर काकडे यांनी पत्नी विद्या, कन्या बिल्वा काकडे (झुरीक) यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले. ते म्हणाले की आम्ही झुरीकमध्ये गेली दहा वर्षे राहत आहोत. मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वित्झर्लंड दौऱ्यासाठी येत आहेत. याचा खूप मोठा आनंद आहे. स्वित्झर्लंडमधील तमाम महाराष्ट्रीयन बांधवांच्यावतीने स्वागत करतो, आणि त्यांच्या या दौऱ्यालाही शुभेच्छा देतो.

प्रभूद्य यत्नाळकर हे मुळचे पुण्याचे आहेत. ते झुरीकमध्ये राहतात. त्यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी स्वागत केले आहे. सौ. मंजिरी यत्नाळकर यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे झुरीकमध्ये स्वागत करताना खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यालाही शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT