Latest

‘एज्यु-दिशा’ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद; शिक्षण, करिअरबाबतच्या शंकांचे निरसन; प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दहावी, बारावीनंतर करिअरबाबत एकाच छताखाली मार्गदर्शन उपलब्ध करून देणार्‍या दै.'पुढारी' एज्यु-दिशा शैक्षणिक प्रदर्शनास रविवारी सुट्टीच्या दिवशी उदंड प्रतिसाद लाभला. राज्यभरातून आलेल्या विविध शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलवर जाऊन विद्यार्थी, पालकांनी बदलते नवीन शैक्षणिक पर्याय व रोजगाराच्या संधीबाबतच्या प्रश्नांचे निरसन केले. प्रदर्शनाचा सोमवारी (दि.29) शेवटचा दिवस असणार आहे. करिअरच्या नवीन वाटा शोधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन सभागृहात दै.'पुढारी'च्या वतीने एज्यु-दिशा शैक्षणिक प्रदर्शन सुरू आहे. संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर हे मुख्य प्रायोजक असून प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. एमआयटी – एडीटी युनिव्हर्सिटी पुणे आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी पुणे सहयोगी प्रायोजक आहेत. अशोकराव माने ग्रुप, वाठार तर्फ वडगाव व चाटे शिक्षण समूह कोल्हापूर सहप्रायोजक आहेत.

प्रदर्शनात अभियांत्रिकी, वैद्यकीय, अ‍ॅग्रीकल्चर यासह पारंपारिक अभ्यासक्रमांचे शिक्षण देणार्‍या नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. पहिल्या दिवसापासून प्रदर्शनास गर्दी पहायला पहायला मिळाली. रविवारी सुट्टीचा दिवस होता. विद्यार्थी व पालकांनी सकाळपासूनच प्रदर्शनाच्या ठिकाणी येण्यास सुरुवात केली. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर जाऊन विद्यार्थी, पालकांनी चांगले महाविद्यालय, विद्यापीठ, नवीन कोर्सेस, त्यासाठीची शैक्षणिक फी, वसतिगृह सुविधा, शिष्यवृत्ती, आवश्यक कागदपत्रे, परदेशी शिक्षण, रोजगाराच्या संधीबाबत माहिती घेतली. एकाच छताखाली करिअर व शैक्षणिक संस्थांची सर्व इंत्थभूत माहिती मिळाल्याने विद्यार्थी, पालकांनी मनातील संभ—म दूर झाल्याची भावना व्यक्त केली.

SCROLL FOR NEXT