Latest

FIFA Womens World Cup : ‘वुमन्स वर्ल्डकप’च्या अंतिम सामन्यात इंग्लडचा प्रवेश; ऑस्ट्रेलियाचा ३-१ ने पराभव

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : वुमन्स वर्ल्डकपच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ३-१ ने पराभव करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मारली. इंग्लंडने प्रथमच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मन्स वर्ल्डकपचा अंतिम सामना इंग्लंड आणि स्पेन यांच्यात  रंगणार आहे. हा सामना दि. २० ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. (FIFA Womens World Cup)

वुमन्स वर्ल्डकपच्या दुसरा उपांत्य सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. सामन्याच्या सुरूवातीपासून इंग्लंडने आक्रमक खेळ करत सामन्यात आपली पकड राखली. ऑस्ट्रेलियाने शॉर्ट पासिंग खेळीचा अवलंब केला.  (FIFA Womens World Cup)

 इंग्लंडने वेगवान चढाया रचत ऑस्ट्रेलियाची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केलेल्या भक्कम बचावामुळे इंग्लंडला गोल करण्यात यश आले नाही. ३६ व्या मिनिटाला इंग्लंडच्या बेला एलाने गोल करत संघाला सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलची परतफेड करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळांडूनी अनेक प्रयत्न केले; परंतु, फिनिशिंगच्या अभावामुळे  गोल करता आला नाही.

सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचा अवलंब केला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने चढाया रचत गोल करण्याच्या प्रयत्न केला. सामन्याच्या ६३ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या सॅम केरने गोल करत १-१ अशी बरोबरी साधली. या गोलनंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी शॉर्ट पासिंग खेळी करत गोल करण्याचा प्रयत्न केला.

सामन्याच्या ७१ व्या मिनिटाला लॉरेन हेम्पने शानदार गोल इंग्लंडला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या गोलची परतफेड करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने अनेक चढाया केल्या. परंतु, इंग्लंडच्या खेळाडूंनी केलेल्या भक्कम बचावामुळे ऑस्ट्रेलियाला गोलची परतफेड करता आली नाही. सामन्याच्या ८६ व्या मिनिटाला इंग्लंडच्या अलेक्सिया रुसोने सुरेख गोल करत संघाच्या विजयावर शिक्कोमोर्तब केले. वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड आणि स्‍पेन यांच्यात खेळण्यात येणार आहे. या सामना रविवार, दि. २० ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT