Latest

नोकरी मिळत नसल्याने इंजिनिअरने संपविले जीवन

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बी.टेक. कॉम्प्युटर पदवी मिळवूनही नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून कोपार्डे (ता. करवीर) येथील मंथन शरद बेंडकळे (वय 22, रा. सांगरूळ फाटा) याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

मनाला चटका लावणार्‍या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंथनने काही ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले होते; पण त्याला यश आले नाही.

काही दिवसांपासून नैराश्याच्या गर्तेत असलेल्या मंथनची आई, वडील व भावाने समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. आपला ऑनलाईन इंटरव्ह्यू आहे, असे सांगून मंथन रविवारी घरी थांबला होता. आई-वडील बाहेर गावी गेले होते; तर भाऊ गणेशोत्सव मंडप उभारणीसाठी गेला होता.

दरम्यान, रविवारी रात्री साडेआठला त्याने स्वयंपाक खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा भाऊ रात्री उशिरा घरी परतल्यावर हा प्रकार निदर्शनास येताच आई-वडिलांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. सीपीआर पोलिस चौकीमध्ये घटनेची नोंद झाली आहे.

SCROLL FOR NEXT