Latest

Elvish Yadav : एल्विश यादवला क्वारंटाईन सेलमधून उच्च-सुरक्षा बॅरेकमध्ये हलवले

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : YouTuber आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादवला क्वारंटाईन (Elvish Yadav) सेलमधून उच्च-सुरक्षा बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने एक्स अकाऊंटवर दिली आहे. (Elvish Yadav)

गुरुग्राम पोलिस देखील करणार चौकशी

रेव पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याचा व्हायरल एक व्हिडिओ यू-ट्यूबर एल्विश यादववर भारी पडले. रविवारी नोएडा पोलिसांनी अटक केल्यानंतर आता रिपोर्टनुसार, गुरुग्राम पोलिस त्यास प्रोटेक्शन रिमांडवर घेण्याची तयारी करत आहे. गुरुग्राम पोलिस एल्विश यादव देखील याप्रकरणी चौकशी करेल.

खरंतर, गुरुग्राम पोलिस एल्विशला मिलेनियम सिटी सेक्टर ५३ ठाण्यात त्याच्याविरोधात दाखल तक्रारी संबंधित चौकशी करणार असल्याचे समजते. एका युट्यूबरला मारहाण केल्याने एल्विशवर गुन्हा नोंद आहे. दुसरीकडे सूरजपूर कोर्टात एल्विश यादवचे वकील आज जामीन अर्ज करू शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT