Latest

Electricity price hike : वीज दरवाढीची सर्वसामान्यांना झळ पोहोचणार नाही: देवेंद्र फडणवीस

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात वीज दरवाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. परंतु सर्वसामान्य माणसावर या वीज दरवाढीचा कुठलाही परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने रचना केल्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. Electricity price hike

एमईआरसीने जो काही निर्णय दिला आहे, त्यानुसार ही दरवाढ आहे. छोट्या माणसावर त्याचा कुठलाही बोजा पडणार नाही, अशा पद्धतीची त्याची रचना करण्यात आलेली आहे. दरम्यान, महायुतीचे जवळपास तिकीट वाटप फायनल झाले आहे. सतत बैठकांविषयी छेडले असता बैठका कराव्याच लागतात. त्याशिवाय सीट फायनल होत नाही. Electricity price hike

आता आम्ही जवळपास पोहोचलो आहोत, आम्ही लवकरच उमेदवार घोषणा करू, दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या मतदारसंघात सर्व काही प्रश्न सुटला आहे, असेही फडणवीस म्हणाले. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील स्टार प्रचारक कोण हे देखील लवकरच जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT