Latest

Electric Vehicle : भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या २०३० पर्यंत दोन कोटींवर पोहचणार – नितीन गडकरी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या २०३० पर्यंत दोन कोटींवर पोहचू शकते, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. सध्या भारतीय लोकांकडून इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. त्यामुळे देशातील इलेक्ट्रॉनिक वाहनांची संख्या वाढताना दिसत आहे. (Electric Vehicle)

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या २ कोटींवर पोहचणार

नितीन गडकरी म्हणाले, देशाभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आज देशात २०.८ लाख इलेक्ट्रिक वाहन आहेत. साल २०२१ च्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या १० लाखांनी वाढली आहे. इलेट्रिक वाहनांच्या संख्येत ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Electric Vehicle) माझा अंदाज आहे की, २०३० आपल्या देशातील इलेक्ट्रीक वाहनांची संख्या २ कोटींवर पोहचेल.

उत्तर प्रदेशमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या सर्वांत जास्त (Electric Vehicle)

उत्तर प्रदेशमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या सर्वांत जास्त आहे. उत्तर प्रदेशमध्ये ४.५ लाख इलेक्ट्रीक दुचाकींची संख्या आहे. आगामी काळात या दुचाकींची संख्या वाढू शकते. ज्यामुळे १० लाखांपेक्षा जास्त रोजगार मिळू शकतो, असे नितीन गडकरी म्हणाले. सध्याची अॅटोमोबाईल इंडस्ट्री ७.८ कोटींची आहे. या इंडस्ट्रीने ४ कोटींपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारला सर्वांत जास्त जीएसटी अॅटोमोबाईल इंडस्ट्रीकडूनच मिळतो. (Electric Vehicle) सध्या ही इंडस्ट्री ७.८ लाख कोटींची आहे. आम्हाला ही इंडस्ट्री १५ लाख कोटींची बनवायची आहे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT