कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : (Eid-ul-Fitr 2023) चंद्रदर्शनाची साक्ष मिळाल्याने शनिवारी (दि. 22) रमजान ईद साजरी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. चांद कमिटीची (हिलाल कमिटी) मन्सूर आलम कासीम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाल्यानंतर अन्य शहरांशी संपर्क करण्यात आला. यावेळी चंद्रदर्शन झाल्याने ईद साजरी करण्याचा निर्णय जाहीर केला.
शुक्रवारी मुस्लिम बोर्डिंग येथे मगरीब नमाज पठणानंतर हिलाल कमिटीने बंगळूर, दिल्ली, देवबंद, लखनौ, रत्नागिरी, रायगड येथे संपर्क साधण्यात आला. या ठिकाणी चंद्र दर्शनाची साक्ष मिळाल्याने ईद साजरी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी मौ. इरफान कासमी, नाझिम पठाण, अब्दुलसलाम कासमी, रऊफ नाईकवडे उपस्थित होते. सालाबादप्रमाणे मुस्लिम बोर्डिंग मैदानावर सकाळी 9 वाजता मुफ्ती इर्शाद कुन्नुरे हे रमजानची नमाज पठण करणार आहे. (Eid-ul-Fitr 2023)
सकाळी 8.15 वा. : विक्रमनगर, वाय.पी. पोवारनगर, सरनाईक वसाहत मशिद
स. 8.30 वा. : मणेर मशिद, फुलेवाडी, बोंद्रेनगर, मणेरमळा, सदरबाझार, लाईन बझार, अबुबकर मशिद, मदिना मशिद, लक्षतीर्थ पुरानी मशिद
स.8.45 वा. : केसापूर, ब—ह्मपुरी मशिद
स. 9 वा. : मुस्लिम बोर्डिंग, कब—स्तान मशिद, घुडणपीर, निहाल पैलवान मरकज, बाबुजमाल, मुडशिंगी, जमादार कॉलनी, कदमवाडी, उत्तरेश्वर पेठ, गवंडी मोहल्ला, साकोली कॉर्नर, बाराइमाम, सिरत मोहल्ला, बडी मशिद, इदगाह (नंगीवली चौक), राजेबागस्वार, शाहूपुरी थोरली मशिद
स. 9.30 वा. : न्यू शाहूपुरी बेकर गल्ली
स. 9.45 वा. : कसाब मशीद.