Latest

आयात वाढल्याने खाद्यतेले आणखी उतरली

अमृता चौगुले

पुणे : सणासुदीचा कालावधी असूनही मुबलक आयातीमुळे खाद्यतेलांचे दर मंदीतच असून, गेल्या आठवड्यातही शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेलांचे दर 15 किलो/लिटरच्या डब्यामागे आणखी 40 ते 50 रुपयांनी कमी झाले. जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ रोखण्याकरिता केंद्र सरकार आवश्यक ती पावले उचलत असून, याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात बॉईल्ड तांदळाच्या निर्यातीवरही
20 टक्के शुल्क लागू करण्यात आले आहे. साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा सरकार विचार करीत असल्याचे वृत्त आहे.

मुबलक पुरवठ्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, पामोलिन तसेच सूर्यफूल तेलाचे दर मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. सणासुदीच्या काळातील वाढती मागणी लक्षात घेऊन भारतातील आयातदारांनी नेहमीपेक्षा सुमारे तीस टक्के अधिक प्रमाणात आयात केली आहे. यामुळे बाजारात खाद्यतेलांची मुबलकता असून, उठाव मात्र एकदम कमी आहे. परिणामी, सर्वच खाद्यतेलांचे दर मंदीकडे झुकले आहेत. गेल्या आठवड्यातही मागणीअभावी खाद्यतेलांचे दर 15 किलो/लिटरच्या डब्यामागे आणखी 40 ते 50 रुपयांनी कमी झाले. वनस्पती तुपाच्या दरातही 30 ते 40 रुपयांनी घट झाली. पावसाने उघडीप दिल्यामुळे भूईमूग शेंगांची आवक लवकर होईल, या अपेक्षेने आणि मागणी कमी असल्यामुळे शेंगदाणा तेलाच्या दरातही 50 रुपयांनी घट झाली.

मागणी वाढल्यामुळे मिलबर गव्हाच्या दरात क्विंटलमागे पन्नास रुपयांनी वाढ झाली. आवक कमी असल्यामुळे तांदळातील तेजी कायम आहे. मागणी साधारण असल्यामुळे गहू आणि ज्वारीचे दर स्थिर होते. आवक साधारण असली तरी उठाव कमी असल्यामुळे साबूदाणा, शेंगदाणा, भगर, मिरची, गोटा खोबरे या जिनसांचे दर स्थिर होते. पोह्यांमधील तेजी कायम असल्याचे सांगण्यात आले.

साखर, गूळ स्थिर
मागणी साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यात साखरेच्या दरात फारसा बदल आढळला नाही. शनिवारी घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रतिक्विटंलचा दर 3 हजार 825 ते 3 हजार 850 रुपये होता. आवक-जावक साधारण असल्यामुळे सर्व प्रकारच्या गुळाचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे – साखर (प्रतिक्विटंल) : 3825 ते 3850 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2600-2750, रिफाइंड तेलः 2550-3200, सरकी तेल 145-1700, सोयाबीन तेल 1450-1700, पामतेल 1350-1500, सूर्यफूल रिफाइंड तेल 1450-1600, वनस्पती तूप 1490-1700, खोबरेल तेल 2200-2250 रु.
तांदूळ :- गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3500, सोनामसुरी 4000-4500, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहर (सुवासिक) 8000-8500, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509-8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु. गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम. पी. लोकवन नं.1 3600-3800, नं.2 3400-3600, सिहोर 4800-5800, सिहोरी 3400-3800, मिलबर
2750-2800 रु. ज्वारी :- गावरान नं. 1- 5500-6000, गावरान नं. 2-5000-5400, नं. 3 4500-4800, दूरी 3800-4200 रु. बाजरी :- महिको 3200-3500, गावरान 3000-3200, हायब्रीड 2800-3000 रु. गूळ : गूळ एकस्ट्रा 4300-4400, गूळ नं. 1 4050-4175, गूळ नं. 2 3925-4025, गूळ नं.3 3800-3875 बॉक्स पॅकिंग 4000-5000 रु.

डाळी : तूरडाळ 13000-16200, हरभराडाळ 6800-7300, मूगडाळ 10200-10500, मसूरडाळ 7800-8000, मटकीडाळ 10000-10500, उडीदडाळ 10000-11500 रु.
कडधान्ये : हरभरा 6200-6300, हुलगा-10000-10500 चवळी 7000-15000, मसूर 6500-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 8000-8200, मटकी गुजरात 8000- 8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11500-12000, वाटाणा हिरवा 8500-9000, वाटाणा पांढरा 6200-6300, काबुली चणा 12000-17000 रु.

साबूदाणा :- साबूदाणा नं. 1 8000, साबूदाणा नं.2 7500, साबूदाणा नं. 3 7200 रु. वरई भगर :- 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1100-1200 रु. शेंगदाणा :- जाडा 12500-13000, स्पॅनिश – 13000 घुंगरू 12000-12500, मेणपुरी 11000-11000 रु. धने : गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु. मका लाल :2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु. पोहे : मध्य प्रदेश 4400-4800, पेण 3900-4200, मध्यम पोहा – 4200-4500, दगडी पोहा 4200- 4900, पातळ पोहा 5000-5600, सुपर पोहा 4800-5300, भाजका पोहा 575-625, मका पोहा 575-625, भाजके डाळे 3200-3650, मुरमुरा राजनांदगाव (9 किलोस) 525, भडंग 850-900, घोटी 550, सुरती 560-580 रु.
रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1650-1700, रवा 1650-1700, मैदा 1650-1700, बेसन :- (50 किलोस) 3900-4200 रु.

मीठ :- मीठ खडे (50 किलोस) 250, मीठ दळलेले (50 किलोस) 270 रु. मिरची:- काश्मीरी ढब्बी 7000-75000, ब्याडगी 5000-5500, लवंगी तेजा 25000-26000, गुंटूर 24000-25000, खुडवा गंटूर 14000-15000, खुडवा ब्याडगी 17000- 20000 रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1150-1250, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1400- 1450, सापसोल 2000-2500 रु.

SCROLL FOR NEXT