Latest

शिक्षक भरती घोटाळा! पश्चिम बंगालच्या माजी शिक्षणमंत्र्याला अटक, ‘ईडी’च्या छाप्यात २० कोटींचे घबाड सापडले

दीपक दि. भांदिगरे

कोलकाता; पुढारी ऑनलाईन : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांना कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याच्या (SSC recruitment scam) संदर्भात ईडीचे पथक कालपासून येथे चौकशी करत आहे. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापा घातला होता.

SSC recruitment scam.

छाप्यादरम्यान चॅटर्जी यांच्या घरातून ईडीने 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. चटर्जी यांनी हे पैसे शिक्षक भरती घोटाळ्यातून मिळवले आहेत, असा संशय ईडीला आहे. अर्पिता यांच्या घरातून 20 वर मोबाईल फोनही ईडीने जप्त केले आहेत. पश्चिम बंगाल शालेय सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण बोर्डातील भरती घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केली. मंत्री चटर्जी यांच्यासह शिक्षण राज्यमंत्री परेश अधिकारी, आमदार माणिक भट्टाचार्य यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत.

पार्थ चॅटर्जी हे ममती बॅनर्जी यांचे निकटवर्तीय

पार्थ चॅटर्जी शिक्षण मंत्री असताना पश्चिम बंगाल सेवा आयोगाकडून झालेल्या भरतीत घोटाळा झाला आहे. पार्थ चॅटर्जी हे सध्या तृणमूल सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग विभागाचे मंत्री आहेत. त्यांनी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालचे सरचिटणीसपदही भूषवले आहे. पार्थ हे मुख्यमंत्री ममती बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते तृणमूलच्या तिकिटावर २००१, २००६, २०११, २०१६ आणि २०२१ असे सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT