Latest

Prakash Raj : प्रकाश राज यांना ‘ईडी’चे समन्स

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तिरुचिरापल्ली येथील प्रणव ज्वेलर्स या संस्थेच्या मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेते प्रकाश राज यांना ईडीने (Prakash Raj) समन्स बजावले आहे. तिरुचिरापल्लीच्या प्रणव ज्वेलर्सवर ईडीने टाकलेल्या छाप्यांत २३ लाख ७० हजार रुपयांची रोकड व काही सोन्याचे दागिने सापडले. याचा कोठेही ताळमेळ बसला नाही. त्यामुळे या प्रकरणात प्रणव ज्वेलर्सचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करणाऱ्या अभिनेता प्रकाश राज यांना ईडीने समन्स बजावले आहे. प्रकाश राज हे दाक्षिणात्य व हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते विरोधक मानले जातात. (Prakash Raj)

SCROLL FOR NEXT