Latest

ED Summons AAP Leader: दुर्गेश पाठक हाजीर हो…! ईडीकडून आणखी एका आप आमदाराला समन्स

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) आपच्या आणखी एका आमदाराला लक्ष्य केले आहे. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते दुर्गेश पाठक यांना देखील ईडीने आज (दि.८) समन्स पाठवले. यानंतर आमदार दुर्गेश हे आज (दि.८) ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. दरम्यान दिल्ली ईडीने आज सोमवारी (दि.८) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांची तुरुंगातच चौकशी केली. (ED Summons AAP Leader)

आपचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता ईडी आपचे आमदार दुर्गेश पाठक यांच्यावर पकड घट्ट करताना दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांच्यासोबतच दुर्गेश पाठक यांचेही नाव मद्य धोरण घोटाळा प्रकरणात पुढे येत आहे. केजरीवालांच्या सचिवांची चौकशी करण्यात आली असून, आता दुर्गेश पाठक यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. दरम्यान ते ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. (ED Summons AAP Leader)

ED Summons AAP Leader: ईडीकडून दुर्गेश पाठक यांचा फोन जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार आणि दुर्गेश पाठक यांची आधीच चौकशी केली आहे. आता ईडीने दुर्गेश पाठकचा मोबाईल जप्त केला असून, त्यांना आज (दि.८) दुपारी २ वाजता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ईडीने विजय नायरच्या घरावर छापा टाकला तेव्हा दुर्गेश पाठकही त्याच्यासोबत उपस्थित होता. (ED Summons AAP Leader)

दुर्गेश पाठक 'राजेंद्रनगर' मधील आमदार

दुर्गेश पाठक हे भारतीय राजकारणी आणि दिल्लीतील विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टी आणि राजकीय व्यवहार समितीचे ज्येष्ठ सदस्य आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी प्रभारी आहेत. ते गोवा निवडणुकीत पक्षाचे प्रभारी ही होते.  सध्या ते दिल्लीतील 'राजेंद्र नगर' येथून आमदार आहेत. ते पक्षाचे जुने नेते आहेत आणि सुरुवातीपासून ते 'आप'शी संबंधित आहेत. विभव कुमार यांच्यानंतर ईडीला दुर्गेश पाठकांचीही चौकशी करायची आहे. दरम्यान दुर्गेश हे सध्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT