Latest

ED Raids In West Bengal: सुरक्षा फौजफाट्यासह पं. बंगालमध्ये ईडीची मोठी कारवाई

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री आणि तुमूल काँग्रेसचे नेते सुजित बोस यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा कोलकाता येथील त्यांच्या ठिकाणांवर छापे टाकत आहे. पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे ५ जानेवारीला झालेल्या हल्ल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आज पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये छापे टाकण्यास सुरूवात केली. (ED Raids In West Bengal)

न्यायालयाकडून संरक्षण मिळाल्यानंतर ईडीचे पथक शुक्रवारी पश्चिम बंगालचे अग्निशमन सेवा मंत्री सुजित बोस यांच्या घरी पोहोचले. वृत्तानुसार, महापालिकेच्या नोकरी घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज (दि.१२) सुजित बोस यांच्या घरावर छापा टाकला. ईडी मोठा सुरक्षा फौजफाटा घेऊन ममता बॅनर्जी मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या घरी पोहोचली आहे. दरम्यान कोलकाता येथील तृणमूल काँग्रेस नेते तपस रॉय यांच्या घरावर देखील ईडीने छापेमारी करण्यास सुरूवात केली आहे. (ED Raids In West Bengal)

याआधी शुक्रवारी ५ जानेवारी रोजी पं. बंगाल येथील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथे ईडी टीमवर झालेल्या हल्ल्यात तीन अधिकारी जखमी झाले होते आणि त्यांचे सामान हिसकावून घेण्यात आले होते. राज्याच्या रेशन वितरण व्यवस्थेतील कथित अनियमिततेच्या संदर्भात छापा टाकण्यासाठी ते टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरी गेले होते तेव्हा हा हल्ला झाला. (ED Raids In West Bengal)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT