चेन्नई : 'पुष्पा', 'आरआरआर' आणि 'पोन्नियिन सेल्वन'सारखे बड्या बजेटचे चित्रपट बनवणार्या 'एलवायसीए' प्रॉडक्शन हाऊसच्या चेन्नई येथील कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर 'ईडी'ने या कंपनीच्या चेन्नईतील 8 कार्यालयांची झडती घेतली. 'एलवायसीए'तर्फे अद्याप कारवाईबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रजनीकांतच्या '2.0', 'दरबार' आणि मणिरत्नमच्या 'पोन्नियिन सेल्वन 1' आणि 'पोन्नियिन सेल्वन 2'ची निर्मिती याच कंपनीने केली आहे.