Latest

मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीचा छापा

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (दि.१) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (केडीसीसी) छापा टाकला आहे. ईडीच्या पथकाने आज सकाळी जिल्हा बँकेच्या शाहूपुरी येथील प्रधान कार्यालयात दाखल होत तपासणी सुरू केली आहे.

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ११ जानेवारी रोजी ईडीने छापेमार केली होती. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने आज केडीसी बॅंकेवर छापा टाकला आहे. आज सकाळी अकरा वाजता ईडीचे पथक जिल्हा बँकेच्या शाहूपुरी येथील प्रधान कार्यालयात पोहचले आहे. अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू असून कारवाईबाबात माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकत्यांनी शाखेसमोर गर्दी केली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT