Latest

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मुलाला ईडीचे समन्स

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा वैभव गहलोत यांना ईडीने नोटीस पाठवली असून शुक्रवार (२७ ऑक्टोबर) रोजी चौकशीसाठी बोलावलं आहे. अशोक गहलोत यांनी स्वत: एक्सवर माहिती देत सांगितलं की, त्यांचा मुलगा वैभव गहलोत यांना ईडीने समन्स पाठवले आहे.

अशोक गहलोत म्हणाले की, आता तुम्ही समजू शकता की, मी सातत्याने म्हणत आलो आहे की, राजस्थानमध्ये रोज ईडीचा छापा यासाठी पडत आहे की, महिला, शेतकरी आणि गरिबांना योजनांचा फायदा मिळू नये, असे भाजपला वाटते. राजस्थानचे राजकीय वातावरण हाय वोल्टेड ड्रामामध्ये बदलंत आहे.

भाजप नेते किरोडी लाल मीणा यांचे म्हणणे होते की, संचार घोटाळ्यावरून ते ईडीशा बातचीत करणार आहेत. असे म्हटले जात आहे की, ईडीची प्रतिक्रिया यावरून असू शकते. जवळपास चार महिन्यांआधी रीट पेपरवरून या गोष्टीचा दावा करण्यात आला होता की, गोविंद सिंह डोटासरा आणि त्यांचे कुटुंबीय या घोटाळ्यात सहभागी आहे.

अशोक गहलोत यांनी व्यक्त केली नाराजी

वैभव गहलोत यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर अशोक गहलोत यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, गोविंद सिंह डोटासरा यांच्या इथे ED चा छापा आणि वैभव गहलोतला ईढी समक्ष हजर होण्यासाठी समन्स मिळाला आहे.

SCROLL FOR NEXT