Latest

Shilpa Shetty Raj Kundra | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला EDचा दणका, ९७ कोटींची मालमत्ता जप्त

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : मनी लॉंड्रिंग प्रकरणी (money laundering case) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठा दणका दिला आहे. ईडी, मुंबईने पीएमएलए, २००२ च्या तरतुदींनुसार रिपू ​​सुदन कुंद्रा उर्फ ​​राज कुंद्रा याच्या मालकीची ९७.७९ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे. कुंद्राच्या या मालमत्तांमध्ये जुहू येथील निवासी फ्लॅटचा समावेश आहे; जो सध्या शिल्पा शेट्टी हिच्या नावावर आहे. तसेच ईडीने राज कुंद्रा याच्या नावावर पुणे येथे असलेला बंगला आणि इक्विटी शेअर्सही जप्त केले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

ईडी तपास करत असलेल्या क्रिप्टोकरन्सी प्रकरणात कुंद्राने खरेदी केलेल्या संलग्न मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. व्हेरिएबल टेक पीटीई लिमिटेड, दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि अनेक एजंटांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमधून मनी लाँडरिंग प्रकरण समोर आले होते. बिटकॉइन्सच्या रूपात दरमहा १० टक्के परतावा देण्याचे खोटे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसा (२०१७ मध्ये ६,६०० कोटी रुपये) लोकांकडून गोळा केल्याचा आरोप आहे. प्रमोटर्सनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आणि अवैधरित्या मिळवलेले बिटकॉइन्स ऑनलाइन वॉलेटमध्ये लपविल्याचा दावा ईडीने केला आहे.

कुंद्राला युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार्म उभारण्यासाठी गेन बिटकॉइन घोटाळ्याचा मास्टरमाईंड आणि प्रमोटर अमित भारद्वाज याच्याकडून २८५ बिटकॉइन्स मिळाले होते, असे ईडीने म्हटले आहे. कुंद्रा यांच्याकडे सध्या २८५ बिटकॉइन्स आहेत, ज्यांची किंमत १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, असे ईडीने नमूद केले आहे. (cryptocurrency case)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT